मुंबई विद्यापिठाच्या कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार प्राध्यापक सुनिल भिरूड यांच्याकडे सोपवण्यात आला अाहे. शुक्रवारी ७ सप्टेंबर रोजी मुंबई विद्यापिठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी भिरूड यांच्याकडे कार्यभार सोपवला. भिरूड यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार पुढील सहा महिन्यांसाठी किंवा सरळसेवेने पदभरणा होईपर्यंत असणार आहे.
भिरुड हे वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट माटुंगा येथील संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विभागात प्राध्यापक असून ते मुंबई विद्यापिठाचे प्रभारी कुलसचिव म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. भिरूड यांनी अभियांत्रिकी शाखेत एम.ई. आणि पीएचडी केली अाहे. त्यांना २९ वर्षांचा अध्यापनाचा आणि ५ वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे. रिसर्च आणि डेव्हलपमेंट क्षेत्रातही त्यांनी एक वर्षांचं महत्वाचं योगदान दिलं असून २०१० ते २०१५ साली एआयसीटी नवी दिल्ली मध्ये सल्लागार म्हणूनही त्यांनी योगदान दिलं आहे. एआयसीटी मधील ई-गव्हर्नन्स सिस्टम, लीगल सेल, व्हिजिलेंस ऑफिसर आणि डायरेक्टर पब्लिक ग्रीव्हंस सेल या पदावर त्यांनी काम केलं आहे.
प्राध्यापक सुनिल भिरुड यांनी शुक्रवारपासून कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार स्विकारला आहे. तसंच गेल्या वर्षभरापासून प्रभारी कुलसचिव पदाचा कार्यभार यशस्वीरित्या सांभाळल्याबद्दल डॉ. दिनेश कांबळे यांचं मी अभिनंदन करुन विशेष आभार मानतो.
- डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरु, मुंबई विद्यापीठ
हेही वाचा -
सरकारला विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची वाटत नाही का? - हायकोर्ट
आधारकार्ड नसेल तरी विद्यार्थ्याना प्रवेश मिळणार