गोवंडीतील जाफरी स्कूलमधील दोन शिक्षकांनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन, फोन रिचार्ज आणि त्यांच्या कुटुंबासाठी इतर सहकार्य यासारख्या ऑनलाईन शिक्षणाची साधने उपलब्ध करुन देण्यासाठी निधी उभारण्याची मोहीम सुरू केली आहे. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणावर अडथळा येऊ नये, यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे.
निधी गोळा करण्याचा कार्यक्रम भाग्यश्री नंबियार आणि अनिशा चमारिया यांनी सुरू केला होता. ज्यायोगे केवळ दोन लाख डॉलर्स वाढवण्याचे उद्दिष्ट होते. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येनं रोजंदारीवर काम करतात.
जाफरी स्कूलमधील विद्यार्थी मुख्यत: गोवंडीच्या झोपडपट्टी भागातील आहेत. काहींकडे मोबाईल नाही, तर काहींकडे इंटरनेट नाही. क्लासमध्ये ६६ विद्यार्थी होते. पण जेव्हापासून ऑनलाईन क्लास सुरू झाला तेव्हापासून फक्त ३५ विद्यार्थी हजर असतात.
Ketoo.org वर ४५ दिवसांमध्ये केवळ ८० हजार निधी जमा झाला. या पैशांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या मूलभूत स्टेशनरी गरजा आणि गंभीर वैद्यकीय खर्चासाठी केला जाईल, असं शिक्षकांनी सांगितलं. कुटुंबियांचं कमी उत्पन्न असलेल्या मुलांवर परिणाम झाला आहे. केट्टोच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशामुळे आमच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करुन देण्यात येईल, ”असं शिक्षक भाग्यश्री नंबियार यांनी सांगितलं.