Advertisement

विद्यापीठाच्या परीक्षांबाबत शुक्रवारी जाहीर होणार निर्णय


विद्यापीठाच्या परीक्षांबाबत शुक्रवारी जाहीर होणार निर्णय
SHARES

कोरोनाच्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल होता. त्यानुसार या परीक्षा नेमक्या कधी होणार या परीक्षांचं नव्यानं वेळापत्रक कधी जाहीर होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आल होता. मात्र, अखेर महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी ट्विटरवरुन परीक्षांबाबत माहिती दिली आहे. राज्यातील विद्यापीठ परीक्षांविषयी अंतिम निर्णय शुक्रवार ८ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या महिन्यात सध्याच्या परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी तज्ञ समितीची बैठक झाली. या बैठकीत विद्यापीठ परीक्षा, राज्यस्तरीय सीईटी परीक्षा, या वर्षाकरीता प्रलंबित असलेल्या कामांसाठी योजना आखणं आणि शैक्षणिक वर्ष २०२०-२१ बाबत चर्चा करण्यात आली.

'कुलगुरूंच्या समितीनं परीक्षांबाबतचा अहवाल शासनाकडं सादर केला. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी दिलेल्या आदेशानुसार शुक्रवार दिनांक ८ रोजी दुपारी १ वाजता परीक्षांबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे', अशी माहिती उदय सामंत यांनी ट्विटरवरुन दिली.

यूजीसीनं नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रलंबित असलेल्या परीक्षा व प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. देशव्यापी परिस्थिती लक्षात घेता मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठांना ऑनलाइन कोचिंगची योजना राबविण्यास आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सुचविले आहे. नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट २०२० मध्ये घेण्याची शक्यता आहे. तसंच, दृतीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी १ ऑगस्टपासून वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी १ सप्टेंबरपासून वर्ग सुरू होण्याची शक्यता असल्याचं यूजीसीनं वेबसाइटवरील अहवालात नमूद केले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा