Advertisement

'मी हॉलीवूडमध्ये जाण्यास इच्छुक नाही'


'मी हॉलीवूडमध्ये जाण्यास इच्छुक नाही'
SHARES

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा आणि दीपिका पदुकोण हॉलीवूडमध्ये झेंडे गाडत आहेत. सर्वांकडून दोघींचे कौतुकही होत आहे. पण बॉलीवूड क्विन कंगना रानौतचे यावर वेगळेच मत आहे. एका मुलाखतीत कंगनाला तु हॉलीवूडमध्ये काम करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कंगनाने दिलेले उत्तर ऐकून सर्वांच्याच भूवया उचावल्या. "कोणी मूर्खच असेल जो सध्याचा घडीला हॉलीवूडमध्ये काम करेल. हॉलीवडूमध्ये डिजिटल मीडियाचा बोलबाला आहे. याचा परिणाम थिएटर बिजनेसवर झालाय. त्यामुळे मी हॉलीवूडमध्ये जाण्यास इच्छुक नाही," असे कंगनाने स्पष्ट केले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा