बिग बॉस नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आहे. बिग बॉसच्या घरात आजवर अनेकवेळा नॉमिनेशन प्रक्रिया पार पडल्या ज्यामध्ये सदस्यांनी त्यांना घरामध्ये नको असलेल्या सदस्यांना नॉमिनेट केले. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्य या पर्वाचे विजेतेपद मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. घरातील सदस्य त्यांच्यासोबत काही सदस्यांना अंतिम फेरीमध्ये बघत आहेत. त्यामुळेच बिग बॉस यांनी काल वेगळ्या प्रकारे नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली.
या अनोख्या प्रक्रियेमध्ये सदस्यांनी त्यांना नको असलेल्या सदस्यांना नॉमिनेट न करता त्यांच्या आवडत्या सदस्यांना नॉमिनेशनमधून वाचवायचे होते. या टास्कमध्ये किशोरी शहाणे घराच्या कॅप्टन असल्याने आणि शिव बिग बॉसद्वारे नॉमिनेट असल्याने सदस्य त्यांची नावे घेऊ शकले नाहीत. पण त्यांनी मात्र सदस्यांना सेफ केले.
बिग बॉसमध्ये पार पडलेल्या या टास्कमध्ये वीणा, आरोह, नेहा, शिवानी सेफ झाली. तर कमी मत मिळाल्याने हीना या आठवड्यातील घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाली. बघूया या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल आणि कोणाला प्रेक्षकांची मते वाचवतील.
हेही वाचा -
अमेयची इमेज ब्रेक करणार 'सेक्रेड गेम्स'