Advertisement

हिमेशने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ!


हिमेशने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ!
SHARES

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा माहोल आहेसोनम कपूरनेहा धुपियानंतर आता गायक हिमेश रेशमियाने देखील लग्न केलं आहेहिमेशने आपली गर्लफ्रेंड सोनिया कपूरसोबत लग्न केलं आहेसोनिया ही एक टीव्ही अभिनेत्री आहेया आधी या दोघांनी अनेकवेळा एकत्र पाहण्यात आलं होतं.

सोनिया आणि हिमेशने कोर्ट मॅरेज केलं आहेदोन दिवस आधीच हिमेश आणि सोनियाचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडलाज्यात कुटूंबीय आणि जवळचा मित्र परिवार सहभागी झाला होता.



हिमेशचं हे दुसरं लग्न आहेया आधी कोमलसोबत हिमेशचं लग्न झालं होतंमात्र तब्बल २२ वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतलाया दोघांना स्वयम नावाचा मुलगा आहेकोमलशी घटस्फोट घेतल्यानंतर हिमेश सोनियाबरोबर लिव्ह इनमध्ये रहात होताअखेर या दोघांनी लग्नबंधनात अडकायचा निर्णय घेतला.

काही दिवसांपूर्वी हिमेशने सारेगमपा या रिअॅलिटी शो साठी परीक्षक म्हणून काम बघितलं२००३ मध्ये तेरे नाम या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे हिमेश सगळ्यांचा आवडता झाला.


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा