Advertisement

लक्ष्मी-मल्हारच्या नव्या नात्याची सुरुवात!


लक्ष्मी-मल्हारच्या नव्या नात्याची सुरुवात!
SHARES

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ या मालिकेमध्ये लक्ष्मी, आर्वी आणि मल्हारच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडत आहेत. मल्हार आणि लक्ष्मीच्या लग्नानंतर अचानकच लक्ष्मी गायब झाली. मल्हारनं तिला शोधण्याचा बराच प्रयत्नदेखील केला. पण त्या दोघांची भेट झाली नाही.


साखरपुड्यामध्ये लक्ष्मीही सहभागी 

दुसरीकडे मल्हार आणि आर्वीच्या घरामध्ये त्या दोघांच्या साखरपुड्याची तयारी सुरु आहे. या साखरपुड्यामध्ये लक्ष्मीही सहभागी होणार आहे, जे मल्हारला ठाऊक नाही. साखरपुड्यासाठी मल्हार आणि आर्वी तसंच लक्ष्मी तयार झाले आहेत. यानंतर या तिघांच्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळणार आहे. लक्ष्मी आणि मल्हारच्या नव्या नात्याची कशी सुरुवात होते हे पाहायला मिळेल.

मल्हारसमोर येण्यास नकार 

लक्ष्मीने आर्वीला तिचं नाव लच्छी असं सांगितलं आहे याची कल्पना मल्हारला नाही. लच्छीचं खरं नाव लक्ष्मी आहे... लक्ष्मी आणि मल्हारचं लग्न झालं आहे... हे लग्न कोणत्या परीस्थितीत झालं याची कल्पना आर्वीला नाही. परंतू मल्हारची होणारी बायको आर्वी आहे हे मात्र लक्ष्मीला समजलं आहे. त्यामुळेच ती मल्हारसमोर येण्यास नकार देत आहे. लक्ष्मी आता घर सोडून जाण्याचा निर्णय घेणार आहे. परंतु नियतीने काय वाढून ठेवलं हे तिला ठाऊक नाही. लक्ष्मी आणि आर्वी या चांगल्या मैत्रिणी बनल्या आहेत. त्यामुळे तिच्या साखरपुड्याला लक्ष्मीला जाणं भागच आहे. हा साखरपुडा निर्विघ्नपणे पार पडेल का?


पुढे काय होईल?

आता मल्हार, आर्वी आणि लक्ष्मी हे तिघं नियतीच्या धाग्यात बांधले गेले आहेत. यात त्या तिघांचाही दोष नाही. तिघेही आपापल्यापरीने त्यांच्या माणसांवर निस्वार्थी प्रेम करत आहेत. तेव्हा आता नक्की पुढे काय होईल? लक्ष्मीने मोठ्या मनानं हे स्वीकारलं आहे, पण लक्ष्मी मल्हारच्या आणि तिच्या लग्नाचे सत्य आर्वीला सांगेल का? पुढे काय होईल? हे या मालिकेत पाहायला मिळेल.



हेही वाचा -

संजयचा ‘लकी’ येतोय...

Exclusive: अभिनेत्री मृण्मयीचं दिग्दर्शनात पदार्पण!





संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा