Advertisement

'भूतकाळ' प्रेक्षकांच्या भेटीला


SHARES

मुंबई - थरारपटांची आवड असलेल्या चित्रपटरसिकांच्या भेटीला दिग्दर्शक अनिल वाघमारे 'भूतकाळ' हा चित्रपट घेऊन येतायत. वाहिन्यांवरील विविध मालिकांमधून घराघरात पोहोचलेले भूषण प्रधान आणि हेमांगी कवी ही जोडी चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसतील. रोमँटिक भूमिका साकारणारा अभिनेता अशी ओळख कायम ठेवत वेगळी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी भूषणला या चित्रपटाच्या निमित्तानं मिळालीय. तर विनोदी व्यक्तिरेखांच्या बाहेर येण्याचं आव्हान पेलण्याचा प्रयत्न हेमांगीनं केलाय. 'भूतकाळ' च्या निमित्तानं कलाकार म्हणून आपला भविष्यकाळ घडवू पाहणा-या हेमांगी कवी आणि भूषण प्रधान यांनी 'मुंबई लाइव्ह' शी मस्त गप्पा मारल्या. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा