Advertisement

शूटिंगदरम्यान कोसळला अभिनेता, मदतीला कुणीच न आल्यानं जागीच झाला मत्यू

४४ वर्षीय प्रबीश एका युट्यूब चॅनलसाठी एक व्हिडिओ शूट करत होते. त्याचवेळी ते कोसळले आणि बेशुद्ध पडले.

शूटिंगदरम्यान कोसळला अभिनेता, मदतीला कुणीच न आल्यानं जागीच झाला मत्यू
SHARES

प्रसिद्ध मल्याळम अभिनेते प्रबीश चकलाकल यांचे शूटिंगदरम्यान निधन झाले. ते कोच्ची इथं शूटिंग करत होते. ४४ वर्षीय प्रबीश एका युट्यूब चॅनलसाठी एक व्हिडिओ शूट करत होते. त्याचवेळी ते कोसळले आणि बेशुद्ध पडले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

एका व्हिडिओसाठी प्रबीश शूट करत होते. त्यांच्या शूटिंगचा काही भाग संपल्यानंतर सेटवरच ते कोसळले. सह कलाकारांनी आणि उपस्थितांनी त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची मदत करण्यासाठी कोणीच तयार होत नव्हतं.

एकही वाहन त्यांना मदत करण्यासाठी तयार नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात उशीर झाला. रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

केरळमधील कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्यासाठी ही टीम जाहिरातीचे शूटिंग करत होती. प्रबीश यांच्या शूटिंगचा काही भाग संपल्यानंतर सेटवरच ते कोसळले. त्याआधी त्यांनी आपल्या सहकार्यांबरोबर एक ग्रुप फोटोही काढला होता.

प्रबीश यांनी अलीकडेच कोचीन कोलाज चॅनेलच्या ओणम शोमध्ये महाबलीची भूमिका केली होती. त्यांनी अनेक टेलिफिल्म्समध्ये काम केलं आहे. यासोबतच डबिंग कलाकार म्हणून अनेक चित्रपटात काम केलं आहे.

अॅब्रिड शाईनवर आधारित कुंग फू मास्टर चित्रपटात त्यांनी खलनायकाच्या व्यक्तिरेखेसाठी डबिंग केलं होतं. ते जेएसडब्ल्यू सिमेंट्स लिमिटेडचे कर्मचारीही होते. त्यांच्या पश्च्यात वडील, पत्नी आणि एक मुलगी आहे.



हेही वाचा

मिम्स शेअर करत कंगनाकडून मुख्यमंत्र्यांना रावणाची उपमा

National School Of Drama च्या संचालकपदी परेश रावल यांची नियुक्ती

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा