Advertisement

इतिहासात पहिल्यांदाच एटीएमवर चालणार टीजर!


इतिहासात पहिल्यांदाच एटीएमवर चालणार टीजर!
SHARES

हल्ली सिनेमाचं प्रमोशन ही खूप मोठी गोष्ट झाली आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधी त्याची 'हवा' खरंतर त्या सिनेमाचं प्रमोशन करतं. त्यामुळे सिनेमाचं प्रमोशन कसं चांगलं आणि वेगळं होईल, याकडे जास्त लक्ष दिलं जातं. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या अंकुश चौधरी आणि तेजस्विनी पंडीत ही स्टारकास्ट असलेला मराठी सिनेमा 'देवा' या सिनेमानेही अगदी सुरवातीपासून प्रमोशनसाठी वेगळी शक्कल लढवली आहे. या सिनेमाचं पोस्टर लॉन्च मध्यरात्री केलं होत. तर सिनेमाचा टीजर प्लाझा सिनेमागृहात टेक्निशियन्सच्या हस्ते करण्यात आला होता. आता 'देवा' चक्क ए.टी.एम. मधून लोकांना भेटणार आहे.

ए.टी.एम.मध्ये देवाचा टीजर दाखवण्यात येणार आहे. काही ए.टी.एम.मध्ये याची सुरुवातही करण्यात आली आहे. साधारणपणे २००हून अधिक ए.टी.एम.मध्ये या सिनेमाचा टीजर दाखवण्यात येणार आहे.

ए.टी.एम.द्वारे अशा प्रकारे सिनेमाचा टीजर दाखवण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे प्रेक्षकांनाही त्याचं कौतुक वाटतंय. त्यामुळे सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आता नवनवी शक्कल लढवली जातेय आणि येणाऱ्या काळात अजूनही काहीतरी भन्नाट पाहायला मिळेल असंच दिसतंय.



हेही वाचा

सोनाली, प्राजक्ताच्या 'हंपी'चा ट्रेलर लॉन्च!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा