Advertisement

मुंबईचे महापौर 'अनिल कपूर'!


मुंबईचे महापौर 'अनिल कपूर'!
SHARES

मुंबई - मुंबईचे नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या फ्रेंच कट दाढीमागे एक रहस्य लपलंय. आपण ‘रिश्ते’ आणि ‘रेस टू’ पाहिले असतीलच. त्यात अनिल कपूरने फ्रेंच कट दाढी ठेवत अभिनय केला आहे . या अनिल कपूरचे प्रचंड चाहते विश्वनाथ महाडेश्वर असून, अनिल कपूरसारखी फ्रेंच कट दाढी ठेवून त्याच्यासारखे राहण्याचा ते केवळ प्रयत्नच करत नसून, त्यांची मिमिक्रीही करत आपल्यातील अभिनयाला ते वाव देत असतात. त्यामुळे कालपर्यंत त्यांच्या विद्यार्थी वर्गामध्ये सुरु असलेली कुजबूज आता मुंबईकरांच्या कानापर्यंत ऐकू येवू लागली आहे.

मुंबईच्या महापौरपदी सांताक्रुझमधील शिवसेनेचे नगरसेवक प्राचार्य विश्वनाथ महाडेश्वर यांची वर्णी लागली. महाडेश्वर यांनी महापौरपदाच्या स्पर्धेतील सर्वांनाच मागे सारत शेवटच्या क्षणाला महापौरपदी बसण्याचा बहुमान मिळवला. महापौरपदाची उमेदवारी जाहीर झाल्यापासून महाडेश्वर यांचे नाव चर्चेतच राहिले असून, त्यांच्यातील अवलीया कलावंताची चर्चाही चांगलीच ऐकायला मिळत आहे. महाडेश्वर हे चित्रपट कलाकार अनिल कपूर यांचे प्रचंड चाहते असल्याची माहिती मिळत आहे. ते शिकवत असलेल्या शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या मित्र परिवारामध्येही याची चर्चा ऐकायला मिळत आहे. महापौरपदाचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महाडेश्वर यांनी आपल्या शाळेत जावून विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या. यावेळीही विद्यार्थ्यांनी महाडेश्वर यांना अनिल कपूर यांची नक्कल करत मिमिक्री करण्याची विनंती केली. परंतु त्यावेळी पत्रकार उपस्थित असल्यामुळे त्यांनी नकार दिला. पण मुलांनी पुन्हा आग्रह धरल्यामुळे त्यांनी अनिल कपूरची मिमिक्री करत मुलांची फर्माईश पूर्ण केली. अनिल कपूरचे चाहते असल्यामुळेच त्यांनी फ्रेंच कट दाढी ठेवली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते. अनिल कपूर यांनी अलिकडच्या रेस आणि रिश्ते टू या चित्रपटात फ्रेंच कट दाढी ठेवली होती. अनिल कपूरच्या या नव्या लुकचा प्रभावही महाडेश्वर यांच्यावर असल्यामुळे त्यांनी ही दाढी ठेवली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी स्मित हास्य करत यावर बोलण्याचे टाळले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा