Advertisement

परश्याची बॉलीवूड एंट्री !


परश्याची बॉलीवूड एंट्री !
SHARES

अख्या महाराष्ट्राला 'याड' लावणारा परश्या म्हणजेच आकाश ठोसर आता लवकरच बॉलिवूड मध्ये झळकणार आहे. अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटातून आकाश बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. एवढच नाही तर आकाशसोबत राधिका आपटे ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.आकाशच्या बॉलिवूडमधील पदार्पणाला खुद्द अनुराग कश्यपनंच दुजोरा दिला आहे.

या चित्रपटात आकाश-राधिका एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण असून या चित्रपटातल्या काही दृश्यांचं शूटिंगही मुंबईत झाल्याची माहिती अनुराग कश्यपनं दिली आहे. या सिनेमाची स्क्रिप्ट खुद्द राधिकाने लिहिली आहे.

या आधी आकाशने त्याचा पहिला सिनेमा 'सैराट' मधून प्रेक्षकांना त्याच्या प्रेमात पाडलं नंतर तो महेश मांजरेकर यांच्या एफयु या सिनेमात झळकला होता. आता तो थेट बॉलिवूडमध्ये इंट्री करतोय. तिथेही तो प्रेक्षकांना याड लावतो का , हे वेळच सांगेल. सध्या तरी या सिनेमाबद्दलची अधिक माहीत गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा