सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आणि गायक कुमार सानू यांचा ब्रिटिश संसदेमध्ये इंडो-ब्रिटिश आॅल पार्टी पार्लमेंट्री ग्रूपच्या वतीनं लंडनमध्ये सत्कार करण्यात आला. परदेशामध्ये भारतीय सिनेसृष्टीशी निगडित कामांसोबतच इतर सामाजिक कार्यांमधील अभूतपूर्व योगदानाकरिता अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांना सन्मानित करण्यात आलं.
भारतीय संगीत क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्व असल्याने समाजाप्रती आपल्या काही जबाबदाऱ्या असून, समाजाला काहीतरी परतफेड करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे लोकांचं प्रेम आहे, जे दिवसेंदिवस वाढतच आहे. एका ऐतिहासिक ठिकाणी सत्कार होत असल्याचा आनंद आहे. ८०० वर्षांची परंपरा लाभलेल्या तसंच सर्व संविधानांची आई मानल्या जाणाऱ्या ब्रिटिश संसदेत हा बहुमान मिळणं, हे लोकांच्या प्रेमामुळेच शक्य झालं आहे. आपण केलेले प्रयत्न जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून, त्याची दखल घेतली जात असल्याची जाणीव करून देणरा हा प्रसंग असल्याचं म्हणत अनुराधा यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
अनुराधा यांनी आजवरच्या कारकिर्दीमध्ये देशभरातील विविध भाषांमध्ये १५०० हून अधिक गाणी गायली आहेत. यापूर्वी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन अनुराधा पौडवाल यांच्या कार्याचा गौरव केला आहे. अनुराधा यांनी आपल्या सुमधूर वाणीने बॅालिवुड गीतांसोबतच अनेक भक्तीगीतंही अजरामर केली आहेत.
यापूर्वी भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार देऊन अनुराधा पौडवाल यांच्या कार्याचा गौरव केला आहे. अनुराधा यांनी आपल्या सुमधूर वाणीने बॅालिवुड गीतांसोबतच अनेक भक्तीगीतंही अजरामर केली आहेत. ९०च्या दशकात कुमार सानू यांचा आवाज आणि त्यांच्या आवाजातील गाणी सुपरहिट ठरली होती. त्यांनीही महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे.
हेही वाचा -
Exclusive: अशा राजकारण्यांना धरून बडवायला हवं- शरद पोंक्षे
अभिनेता कवी कुमार अाझाद उर्फ डाॅ. हाथी यांचं निधन