गेल्या काही दिवसांपासून मॉडेल आणि फिटनेस फ्रीक मिलिंद सोमण याची त्याच्यापेक्षा कितीतरी वयाने लहान असलेल्या त्याच्या गर्लफ्रेंडसोबतची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. आता पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आली असून, सोशल मीडियावर त्यांची लव्हस्टोरी नव्याने रंगवली जात आहे. गेल्या बुधवारी मुंबईत अॅमेझॉन इंडिया फॅशन वीकच्या (एआयएफडब्ल्यू) स्प्रिंग समर-२०१८ मध्ये मिलिंद गर्लफ्रेंड अंकितासोबत पोहोचला होता. याबाबतचा त्याने एक फोटोही त्याच्या सोशल अकाउंटवर शेअर केला आहे. न्यूज एजन्सी आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद आणि अंकिता या इव्हेंटमध्ये हातात हात घालून आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार ५१ वर्षीय मिलिंदची गर्लफ्रेंड अंकिताचे वय फक्त १८ वर्ष आहे.
मुंबई मिररच्या रिपोेर्टनुसार, मिलिंदची गर्लफ्रेंड अंकिता एअरहोस्टेस आहे. मिलिंद सोमणने त्याच्या प्रेमाची ही कथा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगजाहीर झाली. हे दोघे गेल्या वर्षाच्या आॅक्टोबर महिन्यापासून एकमेकांना डेट करत आहेत.
२००६ मध्ये मिलिंदने ‘व्हॅली आॅफ फ्लॉवर्स’ या चित्रपटातील स्टार मॅलेन जाम्पनोई हिच्याशी विवाह केला होता. मात्र, त्यांचा विवाह २००९ पर्यंतच टिकला. पुढे या दोघांमध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर मिलिंद अभिनेत्री सहाना गोस्वामी हिला डेट करत होता. सहाना आणि मिलिंदच्या वयातदेखील २१ वर्षांचे अंतर होते. पुढे चार वर्षांनंतर त्यांच्यातील नाते संपले होते. सध्या मिलिंद अंकिताला डेट करत आहे. अंकिताचं वय १८ वर्षे असल्याने दोघांच्या वयात बरंच अंतर आहे. आता या दोघांची लव्हस्टोरी पुढे काय वळण घेणार? यावरच मिलिंदच्या सर्व फॅन्सचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा