‘पप्पी दे पारूला...’ या गाण्याच्या यशानंतर सुमित म्युझिक साऊथचा तडका असलेलं धम्माल गाणं घेऊन येत आहे. अभिनेत्री मयूरी शुभानंदसोबत ‘देवयानी’ फेम अभिनेता संग्राम साळवीची पावलं या गाण्याच्या तालावर थिरकणार आहेत.
‘अन्नाने लावला चुन्ना...’ असं या गाण्याचे बोल आहेत. प्रसाद आप्पा तारकर यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. गीतकार कौतुक शिरोडकर यांनी हे गाणं शब्दबद्ध केलं असून प्रवीण कुवर संगीतबद्ध केलं आहे. भारती मढवी यांनी आपल्या ठसकेबाज आवाजाने या गाण्याला अस्सल तडका दिला आहे.
या गाण्यातून सगळ्यांच्या मनात घर करणाऱ्या देवयानी मालिकेतील अभिनेता संग्राम साळवी तर मयुरी शुभानंद ही अभिनेत्री झळकणार असून लवकर हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राहुल शेट्ये यांनी या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. संग्रामचं हे पहिलंच लोकगीत असल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चाहत्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहायला संग्राम उत्सुक आहे.
‘अन्नाने लावला चुन्ना...’ या गाण्याच्या मेकिंगला यूट्युबवर मिळत असलेला प्रतिसाद पाहता, हे गाणं खूप लोकप्रिय होईल, असा विश्वास मेकर्सकडून व्यक्त केला जात आहे. येत्या काळात या गाण्याचा सिक्वेलसुद्धा येणार असल्याची माहिती दिग्दर्शक प्रसाद तारकर यांनी दिली आहे.
हेही वाचा -