रविवारी मध्यरात्रीपासूनच मुंबई शहर (mumbai) आणि उपनगरात पावसाचा जोर वाढला असून आज पहाटेही काही भागात मुसळधार पाऊस झाला.
दरम्यान, येत्या तीन ते चार तासांत मुंबईत विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबईत सलग चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी दिवसभर पडणाऱ्या पावसाचा जोर मध्यरात्रीनंतर पुन्हा वाढला आहे.
रविवारी रात्री साडे अकरा वाजल्यापासून कांदिवली, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव या उपनगरीय भागात मुसळधार पाऊस (mumbai rain) पडत आहे.
दरम्यान, येत्या तीन ते चार तासांत काही भागात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
रविवारी सकाळी 8 ते रात्री 8 या 12 तासात काही भागात 150 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये ट्रॉम्बेमध्ये 196 मिमी, घाटकोपरमध्ये 191 मिमी, चेंबूरमध्ये 186 मिमी, वडाळ्यात 174 मिमी आणि शिवडीमध्ये 160 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात सध्या पाऊस सक्रिय झाला आहे. कोकणाबरोबरच घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस पडत आहे.
शिवाय, मान्सूनचे वारे दक्षिणेकडे वाहतात त्यामुळे मोठ्या कमी दाबाचा पट्टा सक्रीय होतो. दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत पसरलेल्या समांतर कमी दाबाच्या पट्ट्याच्या परिणामामुळे मुंबईत सध्या मुसळधार पाऊस (mumbai weather) पडत आहे.
हेही वाचा