तळोजा एमआयडीसीमध्ये बिबट्या आढळल्याने तळोजा परिसरातील रहिवासी भागांत आणि औद्योगिक वसाहतीत एकच खळबळ उडाली.
एमआयडीसीतील पेणधर गावाजवळील कोलटेन कंपनीची कंपाऊंड वॉल पार करून बिबट्या कंपनीत शिरल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. १९ नोव्हेंबर रोजी हा बिबट्या कंपनीच्या परिसरात शिरला होता.
तळोजा परिसर औद्योगिक वसाहतीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणं तळोजा एमआयडीसीमध्ये ठिकठिकाणी कामगारांची वसाहत असून या वसाहतीत हजारो कामगार आपल्या कुटुंबासह राहतात. पण बिबट्याच्या वावरामुळं या वसाहतींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हा बिबट्या नेमका कुठून आला त्याचा शोध वनविभाग घेत आहे.