हवामान विभागाकडून मंगळवारी आणि बुधवारीही मुंबईमध्ये यलो अलर्ट असून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने सोमवारी दिलेल्या पूर्वानुमानानुसार मुंबईमध्ये मंगळवार आणि बुधवारी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्येही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे
हवामान विभागाकडून मुंबईला सोमवारी यलो अॅलर्ट देण्यात आला होता. मात्र दिवसभरात पावसाचा थेंबही पडला नाही. मात्र वातावरणात आर्द्रता अधिक होती.
मंगळवार आणि बुधवारी वेगळ्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30 ते 40 किमी प्रतितास) वाहण्याची शक्यता हवमान खात्याने वर्तवली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) नुसार, मुंबई आणि त्याच्या उपनगरात आज मध्यम पाऊस किंवा गडगडाटासह अंशतः ढगाळ आकाश असेल.
दरम्यान, 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.42 वाजता 0.34 मीटर एवढी कमी भरती येण्याची शक्यता आहे.
IMD मुंबईने आपल्या हवामान अंदाजात म्हटले आहे की सांताक्रूझमध्ये कमाल तापमान 31.5 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 25.6 अंश सेल्सिअस राहील.
दुसरीकडे, कुलाबा येथे कमाल तापमान 31.2 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातही पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, विदर्भातील पावसाचे प्रमाण मंगळवारनंतर कमी होईल.
हेही वाचा