Advertisement

३ महिन्यांत पडलेल्या पावसानं गाठली वार्षिक सरासरी

मुंबईत जून महिन्याच्या सुरूवातीला पावसानं हजेरी लावली नाही. परंतु, जून महिन्याच्या अखेरपासून आतापर्यंत मुंबईत पडलेल्या मुसळधार पावासानं वार्षिक सरासरी गाटली आहे.

३ महिन्यांत पडलेल्या पावसानं गाठली वार्षिक सरासरी
SHARES

मुंबईत जून महिन्याच्या सुरूवातीला पावसानं हजेरी लावली नाही. परंतु, जून महिन्याच्या अखेरपासून आतापर्यंत मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसानं वार्षिक सरासरी गाठली आहे. आतापर्यंत या वर्षाच्या सरासरी पावसाची नोंद झाल्याची माहिती 'स्कायमेट'ने दिली आहे. 

पावसाची हजेरी

२५ जून रोजी मुंबईत मान्सून दाखल झाला. त्यानंतर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. जुनच्या सुरूवातीला पावसानं हजेरी न लावल्यानं मुंबईकरांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं होतं. 

दरवर्षी मुंबईत वार्षिक सरासरी २५१५ मी.मी. पावसाची नोंद होते. मात्र, यंदा मान्सूनचा काळ संपण्यापूर्वीच मुंबईत २५२७.५ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्याशिवाय, पावसाचा आणखी एक महिना बाकी असल्यानं या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. 



हेही वाचा -

गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने थोडक्यात बचावले

बेस्ट बसबाबत माहिती देणारं अॅप तयार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा