Advertisement

उकाड्याने मुंबईकर त्रस्त

पुढील दोन दिवस मुंबईत उष्णतेचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

उकाड्याने मुंबईकर त्रस्त
SHARES

मुंबईतील हवामान दमट (humidity) झाले आहे. सांताक्रूझ (santacruz) आणि कुलाबा या दोन्ही हवामान खात्याच्या केंद्रांमध्ये सोमवारी सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली होती. पुढील दोन दिवस मुंबईत (mumbai) उष्णतेचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सोमवारी हवामान खात्याच्या कुलाबा (colaba) केंद्रात 33.5 अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रावर 34.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. दोन्ही केंद्रांवरील तापमान रविवारच्या तुलनेत एक अंशाने अधिक नोंदवले गेले.

पुढील दोन दिवस तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पाऊस पडल्यानंतर ऊन्हाची तीव्रता अधिकच जाणवत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.

सध्या किमान तापमान सरासरीपेक्षा कमी आहे. पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मंगळवारी मुंबई, पालघर जिल्ह्यात हलका पाऊस तर ठाणे जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Advertisement

गुरुवारपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरणार आहे. बुधवारी बंगालच्या उपसागरात (bay of bengal) दाना चक्रीवादळ (cyclone) तयार होणार आहे. गुरुवार, शुक्रवारी हे चक्रीवादळ ओडिशा (odisha) आणि पश्चिम बंगालच्या (west bengal) किनारपट्टीजवळ सरकणार आहे. हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.



हेही वाचा

लॉरेन्स बिश्नोईला मारणाऱ्या पोलिसाला 1 कोटीचे बक्षिस : करणी सेना

मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण लांबणीवर जाण्याची शक्यता

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा