Advertisement

RMC प्लांट बंद करण्यासाठी जनहित याचिका दाखल

या याचिकेत आसपासच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी रेडी मिक्स्ड काँक्रिट प्लांट्स बंद करण्याची मागणी केली आहे.

RMC प्लांट बंद करण्यासाठी जनहित याचिका दाखल
SHARES

मुंबई उच्च न्यायालयात (HC) पृथ्वी एनजीओने जनहित याचिका (पीआयएल) दाखल केली आहे. या याचिकेत आसपासच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी रेडी मिक्स्ड काँक्रिट (RMC) प्लांट्स बंद करण्याची मागणी केली आहे.

या प्लांटमुळे वायू प्रदूषण आणि आरोग्य धोक्यात आले आहेत. हे गोवंडी, देवनार आणि चेंबूर भागातील वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे.

एनजीओच्या जनहित याचिकेनुसार, लोकांना स्वच्छ हवेत श्वास घेण्याचा मूलभूत अधिकार आहे. तसेच या RMC प्लांट्सच्या प्रदूषणामुळे हजारो रहिवाशांचे आरोग्य धोक्यात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

तसेच आणखीन तीन कंपन्यांचा या याचिकेत नाव घेण्यात आले आहेत. JSW ग्रीन सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड, श्री ललित नागपाल रेडी मिक्स्ड काँक्रीट प्लांट आणि देव इन्फ्रा या तीन कंपन्याही यात सहभागी आहेत.

जनहित याचिकेनुसार, काही RMC प्लांट रहिवासी क्षेत्राच्या 100 मीटर आणि हॉस्पिटलच्या 200 मीटरच्या आत आहेत. हे प्लेसमेंट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) नियमांच्या विरोधात आहे.

GRACP द्वारे केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, जवळपास राहणाऱ्या नागरिकांमध्ये डोकेदुखी, मळमळ, दमा, खोकला आणि श्वास लागणे यासारख्या आरोग्य समस्या होत असल्याची तक्रार केली आहे.

तसेच याचिकेत असे म्हटले आहे की, आरोग्य समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. निवासी भागात बेकायदेशीरपणे कार्यरत असलेले RMC प्लांट कायमचे बंद करण्याचे आदेश न्यायालयाला देण्यास सांगितले आहे.

यापूर्वी जून 2022 मध्ये, सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या (CHS) रहिवाशांनी MPCB कडे औपचारिक तक्रार केली होती. त्यांनी RMC प्लांटमुळे होणारे गंभीर प्रदूषण आणि धूळ याबाबत तक्रार केली होती.

एमपीसीबीच्या अधिकाऱ्याने एका आठवड्यानंतर जागेची पाहणी केली. तसेच प्लांट बंद करण्याचे आदेश दिले. बंद करण्याच्या आदेशानंतरही प्लांट बेकायदेशीरपणे चालूच राहिला. त्यामुळे रहिवाशांच्या तक्रारी वाढल्या.

जानेवारी 2023 मध्ये, रहिवाशांनी प्रदूषण आणि अंमलबजावणीच्या अभावाचा निषेध करत उपोषण केले. RMC प्लांटच्या तात्पुरत्या बंद दरम्यान, हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) मध्ये सुधारणा दिसून आली होती.



हेही वाचा

ठाणे जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत वाढ

मुंबईत निवडणूक काळात घातपाताचा कट

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा