Advertisement

मुंबईत मार्च महिन्यात विक्रमी तापमान

मार्च महिन्यात सर्वसामान्य तापमानापेक्षा हे तापमान ५ अंशानी जात आहे. मार्च महिन्यातील तापमानाचा हा एक विक्रम असल्याचं स्कायमेटने म्हटलं आहे.

मुंबईत मार्च महिन्यात विक्रमी तापमान
SHARES

मागील काही दिवसांपासून उकाडा वाढल्याने मुंबईकर घामघूम झाला आहे. मुंबईतील तापमान ३८ सेल्सिअस अंशावर पोहोचले होते. मार्च महिन्यात सर्वसामान्य तापमानापेक्षा हे तापमान ५ अंशानी जात आहे.  मार्च महिन्यातील तापमानाचा हा  एक विक्रम असल्याचं स्कायमेटने म्हटलं आहे.

मुंबईत ४ मार्च रोजी ३८.१ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सामान्यता मुंबईत मार्चमध्ये तापमान ३२ अंशाच्या आसपास असते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ३०–३१ अंशापर्यंत पारा राहतो. मात्र यंदा तापमानाने विक्रमी नोंद केली आहे. पहिल्या आठवड्यात मुंबईतील तापमान सरासरी ३६.५ सेल्सिअस इतके नोंदले गेले. २०१३ नंतर मुंबईतील पारा मार्चमध्ये ३७ अंशापर्यंत पोहोचला आहे.

थंडी गेल्याने मुंबईत उकाडा चांगलाच वाढला आहे. मुंबईसह कोकणात यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक तीव्र असणार असल्याची माहिती हवामान खात्याचे उपमहासंचालक डॉ. जयंत सरकार यांनी दिली आहे. सरासरी मुंबईतील तापमान हे ३३ अंश सेल्सिअसपर्यंत असतं. तापमानात ११ मार्चपर्यंत २ अंश सेल्सिअसपर्यंत अधिकची वाढ होण्याची शक्यता आहे. तीव्र तापमानामुळे ह्या उन्हाळ्यात जास्त उकाडा जाणवणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा