मुंबईतील तापमानात या आठवड्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सोमवारी कमाल तापमान 33.4° सेल्सिअस होते आणि शनिवारी ते 37.2° सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. जे सामान्य पातळीपेक्षा 5.2° सेल्सिअस जास्त आहे, असे भारतीय हवामान विभाग (IMD) ने म्हटले आहे.
कुलाबा हवामान केंद्रावर, कमाल तापमान 35° सेल्सिअस नोंदवले गेले होते, जे सामान्यपेक्षा 4.4° सेल्सिअस जास्त आहे.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, किमान तापमान 23.4° सेल्सिअस होते, जे नेहमीपेक्षा 2.5° सेल्सिअस जास्त आहे. आयएमडी मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांच्या मते, तापमानातील हा बदल हवामानातील बदलांमुळे आहेत. जे मुंबईत उन्हाळ्याच्या आगमनाचे संकेत देतात. सध्याच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
“पूर्वेकडील वारे, जे तापमान कमी करण्यास मदत करतात, ते दुपारपर्यंत टिकून राहतात. त्यानंतर, वाऱ्याची दिशा वायव्येकडे सरकते, यात तापमान कमी करण्याची क्षमता नसते. या बदलामुळे दिवसाच्या तापमानात वाढ होते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, रविवार, 23 फेब्रुवारीला शहराचे किमान तापमान अंदाजे 25.99 अंश सेल्सिअस असेल, तर कमाल तापमान अंदाजे 29.74 अंश सेल्सिअस असेल.
अनुमानानुसार, दिवसभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस, मुंबईत तापमान वाढण्याची अपेक्षा आहे. कमाल तापमान 36 अंशांच्या आसपास असू शकते.
आयएमडीचा अंदाज आहे की सोमवार, 24 फेब्रुवारी रोजी शहरात किमान तापमान 25 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस राहील. उत्तरेकडून 21 किमी/ताशी वेगाने वारे सतत वाहण्याचा अंदाज आहे आणि आर्द्रता सुमारे 28 टक्के असेल.
हेही वाचा