बिग बॉस मराठीच्या घरातील गणितं आता काहीशी बदलली आहेत. शिवानी सुर्वेची एन्ट्री झाल्यानं घरामध्ये आधीपासूनच आपले डावपेच रचणाऱ्या सदस्यांची तारांबळ उडाली आहे. शिवानीच्या घरामध्ये येण्यानं नेहा आणि माधवला आता थोडा धीर मिळाला आहे, तर हिनाला काल रडू कोसळलं. ज्याप्रकारे माधव आणि सगळे तिच्याशी वागतात तिला घरामध्ये एकटं पडल्यासारखं वाटत आहे. माधवनं तिची माफी मागितली आणि तिच्यासोबत डान्स देखील केला.
वीकेंडचा डावमध्ये रुपाली आणि वीणाची चांगलीच शाळा घेतली. यावरूनच वीणानं आपली खंत महेश मांजरेकरांजवळ व्यक्त केली. कारण वीणाला महेश मांजरेकर म्हणाले की, तू माझी फेव्हरेट सदस्य होती आणि याच वाक्यामुळे ती खूप दुखावली गेली. मागील आठवड्यामध्ये रुपाली आणि वीणा ज्याप्रकारे किशोरी शहाणे यांच्याशी वागल्या ते अत्यंत चुकीचं होतं. शिव आणि वीणा घरामध्ये अजिबात खेळत नसून एकमेकांमागे त्यांचा वेळ जातो आहे हे प्रेक्षकांना देखील दिसतं आहे. त्यांचं हे वागणं निराशाजनक आहे. काल घरामधून कोणीच बाहेर पडलं नाही.
रुपाली आणि माधव डेंजर झोनमध्ये आले असं सांगितल्यावर वीणा आणि नेहाला जरा टेंशन आलं होतं खरं, पण महेश मांजरेकर यांनी जेव्हा जाहीर केलं कि, या आठवड्यात सगळे सेफ आहेत, तेव्हा सगळ्यांनाच खूप आनंद झाला. आज घरामध्ये रुपाली आणि वीणामध्ये कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. घराचा कॅप्टन बनणं हि खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर कॅप्टन बनलेल्या सदस्याला आठवड्याची इम्युनिटी देखील मिळते. त्यामुळं हा टास्क जिंकून कॅप्टन बनणं हे प्रत्येक सदस्यासाठी खूप महत्वाचं असतं. आता या टास्कमध्ये रुपाली आणि वीणा पैकी कोण जिंकतं ते पहायचं आहे. या कॅप्टनसी कार्यामध्ये आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी एका सदस्याला साष्टांग नमस्कार घालण्यासाठी तयार करायचं आहे.
हेही वाचा-
Movie Review : व्हॅाट्सअपवर रंगलेल्या प्रेमाचा फसवा डाव
Movie Review : राजा घडवणाऱ्या गणितातील सुपरहिरोची 'सुपर' कहाणी