विक्रोळी - 'महिला जागृती अभियान' विक्रोळीत राबवण्यात आलं. कधी कुंटुंबात कधी कार्यालयात तर कधी रस्त्यावर कोणत्या ना कोणत्या महिलेवर अन्याय-अत्याचार झाल्याच्या घटना समोर येतच असतात. या परिस्थितीत महिलांनी कादेशीररित्या कशा प्रकारे सामोरे जावे. यासाठी या अभियानातून महिलांना मार्गदर्शन करण्यात आलं.
पश्चिम महाराष्ट्र रहिवाशी सेवा संघच्या वतीने हे अभियान राबवण्यात आले. विक्रोळी पार्क साइटमधील शंकर मंदिर येथे बुधवारी संध्याकाळी आठ वाजता हे अभियान राबवण्यात आले. या वेळी अॅड. आरती सदावर्ते, वांद्रे-कुर्ला पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक दिपशिखा वारे आणि प्रतिभा पाटील यांनी उपस्थित महिलांना कायदे विषयी मार्गदर्शन केले. तसंच या कार्यक्रमात उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात आले. या लकी ड्रॉ मधून पल्लवी पवार, भारती घाटकर आणि संगीता लेंडवे या तिन्ही विजेत्यांना पैठणी साडी देण्यात आली. तसेच महिलांच्या मनोरंजनासाठी संगीत खुर्चीचे देखील आयोजन केले होते. या संगीत खुर्चीत नम्रता मुंडे यांनी प्रथम क्रमांक पटकवला.