भारतीय संस्कृतीला कलेचा वेगळा इतिहास आहे. नऊवारी साडीमध्ये लावणी करणारी कलाकार महिला असो किंवा पुरातन काळातील शिल्पांच्या प्रतिकृती, कलेचा हा वारसा भारतीय कलाप्रेमींनी आजपर्यंत जपलेला आहे. अशाच भारतीय सांस्कृती आणि सौंदर्य यावर आधारित सुप्रसिद्ध चित्रकार सुभाष पंजाबराव तायडे यांचे सोलो एक्झिबिशन नरिमन पॉईंटच्या हॉटेल ट्राइडेंटमध्ये 18 जूनपर्यंत भरवण्यात आले आहे.
चित्रकार सुभाष तायडे जे. जे. स्कुल ऑफ आर्टचे विद्यार्थी आहेत. आजपर्यंत देशातल्या अनेक मोठमोठ्या गॅलरीमध्ये तायडे यांचे सोलो तसेच ग्रुप शो झालेले आहेत. या प्रदर्शनात 20 चित्रांचा समावेश आहे. तसेच तायडे यांची काही विशेष शिल्पे देखील या प्रदर्शनात लावण्यात आली आहेत. रसिक प्रेक्षकांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य असून सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत खुले राहणार आहे.