शितली आणि तिचं गूडलक आज संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. एरव्ही इतरांना गूडलक देत फिरणाऱ्या 'लागीरं झालं जी'मधील शितलीला मालिकेतील सहकलाकारांनी सरप्राइज देत गूडलकही दिलं.
झी मराठीवरील 'लागीरं झालं जी' या लोकप्रिय मालिकेतील शीतल आणि अजिंक्य ही आॅनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. शीतल म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर हिचा नुकताच वाढदिवस झाला. वाढदिवसानिमित्त तिच्या सहकलाकारांनी तिला एक खास सरप्राईज दिलं. हे सरप्राइज शितलीसाठी गूडलकपेक्षा कमी नव्हतं. त्यामुळेच हा वाढदिवस कायम तिच्या आठवणीत राहणारा ठरला आहे.
या मालिकेतील यास्मिन आणि शिवानीची हेअरड्रेसर यांनी रात्री १२ वाजता तिला बिल्डिंगच्या टेरेसवर नेलं. तिथं 'लागीरं झालं जी' या मालिकेतील संपूर्ण कास्ट आणि क्रू टीम शिवानीची वाट पाहत होती. मालिकेतील सर्वांना पाहून शिवानी आश्चर्यचकित झाली. शिवानीसाठी पूर्ण टेरेस फुग्यांनी सजवण्यात आलं होतं. शिवानीनं केक कापला आणि मोठ्या आवाजात म्युझिक लावून एक छोटेखानी पार्टीही केली.
वाढदिवसानिमित्त शिवानीचे आईवडीलही खास तिला भेटायला मुंबईवरून साताऱ्याला गेले होते. शिवानीनं त्यांच्यासोबत वेळ घालवला आणि महाबळेश्वरलाही गेली. ती सेटवर परतली, तेव्हा पुन्हा सर्व कलाकारांनी शिवानीला केक कापायला लावला. शिवनीसाठी हे सरप्राईज खूप मोठं होतं.
याबद्दल शिवानी म्हणाली की, आपला वाढदिवसाचा कुटुंबीयांसोबत साजरा करायला मिळावा यासारखा दुसरा आनंद नाही. त्यांच्याशिवाय वाढदिवसाचा आनंद साजरा होऊ शकत नाही. तो अपूर्णच राहतो. मी माझ्या वास्तवातील कुटुंबासोबतच 'लागीरं झालं जी' या मालिकेच्या कुटुंबासोबतही वाढदिवस साजरा केल्याचा आनंद निराळाच आहे. हे माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं. त्यामुळं हा विढदिवस मी कधीच विसरू शकत नाही.
हेही वाचा -
‘खलनायक’ जोडीचा ‘कलंक’मधील लूक
काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील ५ उमेदवार जाहीर