Advertisement

बिग बॉसच्या घरातील सदस्यांची का झाली पळापळ?

बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्या सदस्यांची तेव्हा घाबरगुंडी उडाली, जेव्हा कारण अचानक सायरन वाजला.

बिग बॉसच्या घरातील सदस्यांची का झाली पळापळ?
SHARES

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वीणा आणि माधवमध्ये कॅप्टनसी टास्क पार पडला. ज्यामध्ये माधवनं बाजी मारून घराचा नवा कॅप्टन होण्याचा मान पटकवला. घरामध्ये नॉमिनेशन कार्य देखील पार पडलं. ज्यामध्ये किशोरी शहाणे, सुरेखा पुणेकर, हिना पांचाळ, वैशाली म्हाडे आणि रुपाली भोसले नॉमीनेट झाले. आता या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार ? कोणाला प्रेक्षकांची मतं वाचवणार ? हे बघणं रंजक असणार आहे.


वादाची ठिणगी 

हीना आणि शिवमध्ये नेहमीच वाद होत असतात. मग ते वीणा वरून असो, वा टास्क दरम्यान असो... आता हीना आणि शिवमध्येही वादाची ठिणगी उडणार आहे. ग्रुपमधील सदस्य एकत्र बसले असताना वैशाली, शिव आणि अभिजीत यांच्यामध्ये गप्पा सुरु होत्या आणि त्यांची थट्टा-मस्करी सुरू होती. अभिजीतला हाताला लागल्यामुळं हिना त्याला क्रेप बँडेज लावत होती, तर अभिजीतवरून वैशाली शिवला म्हणाली की, नात्यांमध्ये तो गल्लत करत नाही. त्यावर अभिजीत म्हणाला की, अगदीच खरं आहे. 


अचानक सायरन वाजला

शिवनं यावरून अभिजीतला चिडवायला सुरुवात केली, पण कुठेतरी हीनला या गोष्टीचा राग आला आणि ती शिववर भडकली. हीनानं शिवला खडसावून सांगितलं की, पुन्हा असं बोललास तर मी खूप घाणेरड्या शब्दांत उत्तर देईन. यावर शिवदेखील तिला म्हणाला तुझ्याशी गंमत नाही केली का मी, माझ्याशी असं बोलायचं नाही. शिव इथेच थांबला नाही तो पुढे म्हणाला की, तुला गोष्टी नाही कळत तर मला विचार. शिव असं काय म्हणाला ज्यावरून हीना त्याच्यावर इतकी चिडली ? ते पहायचं आहे. बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्या सदस्यांची तेव्हा घाबरगुंडी उडाली, जेव्हा कारण अचानक सायरन वाजला.


केव्हीआरमध्ये खटके

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये केव्हीआर म्हणजेच किशोरी, रुपाली आणि वीणा यांचा ग्रुप तयार झाला आहे. त्यांची मैत्री आणि एकमेकांबद्दलच प्रेम सगळ्यांनी पाहिलं आहे, पण आता यांच्यामध्येही खटके उडायला सुरुवात झाली आहे. परागच्या अचानक घराबाहेर पडण्यानं सगळंच बदललं आहे. या तिघी एकत्र आल्या, तरी देखील किशोरी आणि रुपालीला वीणाचं वागणं खटकत आहे. ग्रुपला ती हवा तेवढा वेळ देत नाही आणि संपूर्ण वेळ शिवबरोबर घालवते असे त्यांचं म्हणणं आहे. इतर सदस्यांसोबत बोलण्यात काहीच वावगं नाही पण किमान एक तास तरी आपल्या ग्रुपला म्हणजेच किशोरी आणि रुपाली यांना द्यावा जेणेकरून स्ट्रॅटेजी आखता येईल असं त्यांचं म्हणणं आहे जे त्यांनी पराग असतानाच ठरवलं होतं. 


फूट पडण्याची चिन्हं

कारण, शिव वेळात वेळ काढून टीमला वेळ देतो असं देखील त्यांनी वीणाला सांगितलं. त्यामुळं आता वीणा, रुपाली आणि किशोरीमध्ये वाद होणार आहे. वीणचं म्हणणं आहे सकाळपासून मला बरं नाही, पण कोणीच मला विचारायला आलं नाही. रुपाली माझ्याकडे आली देखील नाही. किशोरी यांनी वीणाला समजवण्याचा प्रयत्न केला कि, काल रात्री ठरलं होतं की आपण बोलायच. यावर रुपाली वीणला म्हणाली की, वीणा तुझ्या वागण्यानं आम्ही खूप हर्ट झालो आहोत. यावर वीणानं त्यांना सांगितलं, मग तुम्ही टीम म्हणून खेळा मी एकटी खेळणार. त्यामुळं केव्हीआर ग्रुपमध्ये फूट पडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

 

रुपाली चिडली

या मुद्द्याची सुरुवात नॉमिनेशन टास्कमुळं झाली. वीणाकडं ग्रुपमध्ये बसून चर्चा करण्यास वेळ नाही, अशी तक्रार त्यांनी तिच्याकडं केली. नॉमिनेशन प्रक्रिया पार पडल्यानंतर वीणानं म्हटलं की, हल्ली आपण गेमबाबत काही ठरवत का नाही? यावर वीणानं तिचे मुद्दे मांडले, परंतु रुपाली तिच्यावर चिडली आणि म्हणाली तुला आजकाल इतरांशी गप्पा मारण्यामधून वेळ मिळत नाही आणि या चर्चेचा त्रास होतो म्हणून हा विषय काढला नाही. तुझ्या कलेनं आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आम्ही असं ठरवलं होतं की तू हा विषय काढलास की बोलायचं.



हेही वाचा -

कार्तिकसोबत हिमाचल प्रदेशात काय करतेय सारा?




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा