Advertisement

यंदा विसर्जनादरम्यान मुंबईत गोंगाट कमी; आवाज फाऊंडेशनची न्यायालयात माहिती

बंदीमुळे यंदा गणेशोत्सवात डीजेचा आवाज बंद झाला नि पारंपारिक वाद्यंच मुंबईत वाजल्यानं मुंबईत यंदा गोंगाट, आवाज कमी झाल्याची माहिती आवाज फाऊंडेशननं एका प्रतिज्ञापत्राद्वारे बुधवारी न्यायालयात सादर केल्याची माहिती आवाज फाऊंडेशनच्या सुमेरा अब्दुलाली यांनी दिली आहे.

यंदा विसर्जनादरम्यान मुंबईत गोंगाट कमी; आवाज फाऊंडेशनची न्यायालयात माहिती
SHARES

दरवर्षी मुंबईत गणेशोत्सवाचा वेगळाच थाट असतो. ढोल-ताशाच्या गजराबरोबरच डीजेच्या तालावर भक्तमंडळी बेधुंद होऊन नाचतात. पण यंदा मात्र मुंबईसह राज्यभर डीजेवर बंदी असल्यानं मुंबईत यंदा विसर्जनादरम्यान डीजे वाजलाच नाही. त्यामुळं विसर्जनादरम्यान गोंगाट दरवर्षीप्रमाणं कमी झाल्याची माहिती आवाज फाऊंडेशनने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.


डीजेवर बंदी 

उत्सवादरम्यान डीजे वाजवल्यानं ध्वनी प्रदूषण वाढत असल्याची म्हणत उत्सवादरम्यान डीजे वाजवण्यावर बंदी आणावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं डीजेमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणावर प्रचंड नाराजी व्यक्त करत सणासुदीच्या काळात डीजेवर बंदी आणली.


पुणे, नाशिकमध्ये गोंगाट 

बंदीमुळे यंदा गणेशोत्सवात डीजेचा आवाज बंद झाला नि पारंपारिक वाद्यंच मुंबईत वाजल्यानं मुंबईत यंदा गोंगाट, आवाज कमी झाल्याची माहिती आवाज फाऊंडेशननं एका प्रतिज्ञापत्राद्वारे बुधवारी न्यायालयात सादर केल्याची माहिती आवाज फाऊंडेशनच्या सुमेरा अब्दुलाली यांनी दिली आहे. मुंबईत डीजे वाजला नाही, गोंगाट झाला नसला तरी पुणे आणि नाशिकमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर गोंगाट झाला, ध्वनी प्रदुषण झालं असंही आवाज फाऊंडेशनने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. 



हेही वाचा - 

दिवाळी भेटीसाठी सुकामेव्याची चलती

दिवाळीनिमित्त गिरगांवात 'किल्ले बांधणी स्पर्धे'चं आयोजन




Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा