Advertisement

Holi 2022 : घरच्या घरी 'असे' बनवा नैसर्गिक रंग

घरच्या घरी तुम्ही नैसर्गिक रंगाने होळी खेळू शकता आणि तुमच्या त्वचेलाही काही नुकसान होणार नाही.

Holi 2022 : घरच्या घरी 'असे' बनवा नैसर्गिक रंग
SHARES

रंगपंचमीच्या रंगांमध्ये अनेक केमिकल्स असतात ज्यामुळे त्वचेला हानी पोहोचते. मात्र तुम्हाला आता घाबरण्याची गरज नाही. घरच्या घरी तुम्ही नैसर्गिक रंगाने होळी खेळू शकता आणि तुमच्या त्वचेलाही काही नुकसान होणार नाही.

लाल रंग

  • रक्तचंदनाच्या पावडरचा वापर करून लाल रंग तयार करता येतो. रक्तचंदन हे शरीराचा दाह कमी करण्यासाठी वापरले जाते. रक्तचंदन उगाळून त्यामध्ये थोडे पाणी घालून याचा ओला रंग करता येईल. किंवा रक्तचंदनाच्या पावडरमध्ये गव्हाचे पीठ घालून त्याचा रंग म्हणून वापर करता येईल.
  • जास्वंदाची फुले रात्रभर पाण्यात घालून ठेवायची. यापासूनही लाल रंग तयार होऊ शकतो. जास्वंदाची फुले सुकवूनही लाल रंग तयार करता येतो मात्र यासाठी ती फुले पूर्ण सुकण्यासाठी वेळ लागतो. जास्वंदाची फुले सावलीत सुकवली जातात.
  • टॉमेटो आणि गाजराचा रस पाण्यात मिसळा आणि ते पाणी वापरा.

गुलाबी रंग

  • किसलेला बीट पाण्यात टाकून तुम्हाला गुलाबी किंला लालसर रंग मिळेल.
  • मैद्यामध्ये बिटाचा रंग घेऊन त्यात थोडं पाणी घाला. यामुळे तुम्हाला कोरडा गुलाबी रंग मिळेल.

पिवळा रंग

  • झेंडूची फुलं किमान पाच ते सहा तास गरम पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर पाणी गाळून घ्या. पिवळ्या रंगाचे पाणी तयार होईल. पिचकारीत तुम्ही हे पाणी भरू शकता.
  • कोरडा पिवळा रंग तयार करण्यासाठी हळदीचा वापर करू शकता. यासाठी हळदीच्या दुप्पट बेसन किंवा मुलतानी माती घालून पिवळा रंग तयार करू शकता. हा लेप त्वचेसाठी फायदेशीर ठरेल.
  • मैदा आणि हळद या मिश्रणात थोडं पाणी घातलंत तरी साधारण ओलसर पिवळा रंग तयार होईल.

नारंगी रंग

  • डाळिंबाची साल गरम पाण्यात आठ ते नऊ तास भिजत ठेवा. त्यानंतर हे पाणी गाळून वापरा,
  • पळसाची फुलं रात्रभर पाण्यात भिजवून किंवा पळसाची फुलं गरम पाण्यात उकळूनही तुम्ही हे पाणी वापरू शकता.

हिरवा रंग

  • पालकाची प्युरी करून किंवा कडुलिंबाचा पाला वाटून तो गाळून घ्या. या पाण्याचा वापर पिचकारी आणि फुग्यांसाठी करता येऊ शकतो. जंतुनाशक म्हणून कडुलिंबाचं पाणी फायदेशीर ठरेल.
  • मैद्यात हिरवा फूड कलर आणि पाणी घालून तुम्ही हिरवा रंग बनवू शकता. तुम्हाला फुड कलर वापरायचा नसेल तर पुदिना किंवा पालकचा रस वापरू शकता.
  • कोरड्या हिरव्या रंगासाठी मेंदी पावडर गव्हाच्या पीठामध्ये मिसळायची. पण विचार करून मेंदीचा रंग शरीरावर काही दिवस तसाच राहू शकतो.

चॉकलेटी रंग

  • चॉकलेटी रंग बनवण्यासाठी तुम्ही खायच्या पानांत वापरली जाणारी कात वापरू शकता.
  • चहा किंवा कॉफी उकळून ती गाळून थंड करून त्याचे पाणी तुम्ही वापरू शकता.
  • मैद्यामध्ये चॉकलेटी फूड कलर आणि थोडं पाणी घालून तुम्ही चॉकलेटी रंग मिळवू शकता.


काळा रंग

  • आवळ्याची पावडर रात्रभर लोखंडी भांड्यात भिजत घालावी, दुसऱ्या दिवशी यात पाणी घालावे. यापासून काळा ओला रंग मिळतो.
  • काळ्या द्राक्षांचा रस पाण्यात मिसळा आणि ते पाणी गाळून वापरा.

निळा रंग

  • निळ्या जास्वंदापासून किंवा नीलमोहोरापासून निळा रंग निर्माण करता येतो. ही फुले पाण्यात बुडवून त्यापासून ओला निळा रंग मिळेल. ही फुले सुकवून त्याची पावडर करूनही निळा रंग तयार करता येऊ शकतो.



हेही वाचा

होळी धुळवड साजरी करण्याआधी 'हे' नियम वाचा

‘तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात…’; होळीच्या नियमांवरून भाजपाचा ठाकरे सरकारवर निशाणा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा