Advertisement

नवरात्रौत्सव २०१९ : मुंबईतल्या 'या' ५ ठिकाणी गरब्याच्या तालावर 'हालो रे हालो'

हल्ली गरब्याला इव्हेंटचं स्वरूप आलं आहे. अनेक ठिकाणी गरब्याचे इव्हेंट्स आयोजित केले जातात. आम्ही देखील तुम्हाला मुंबईत गरबा कुठे खेळाल हे सांगणार आहोत.

नवरात्रौत्सव २०१९ : मुंबईतल्या 'या' ५ ठिकाणी गरब्याच्या तालावर 'हालो रे हालो'
SHARES

गणपती झाले की वेध लागतात नवरात्रीचे. आणि नवरात्र म्हटलं की आठवतो तो नऊ दिवस खेळला जाणारा गरबा किंवा दांडिया हा नृत्यप्रकार. सगळे जण नवरात्रीमधील रास- दांडियाची अगदी आतुरतेनं वाट बघत असतात. हल्ली गरब्याला इव्हेंटचं स्वरूप आलं आहे. अनेक ठिकाणी गरब्याचे इव्हेंट्स आयोजित केले जातात. आम्ही देखील तुम्हाला मुंबईत गरबा कुठं खेळाल हे सांगणार आहोत


) नवरात्री उत्सव विथ फाल्गुनी पाठक, बोरीवली

गरबा-दांडिया आणि फाल्गुनी पाठक हे एक समीकरणच आहे. ‘मैने पायल है छनकाई.’, ‘चुनरी उड उड जाए.’, ‘चुडी जो खनकी हाथों में.’, ‘ओ पिया ओ पिया लेके डोलिया’, ‘सावरिया तेरे याद में’पासून अगदी गुजराती पारंपरिक गरब्याच्या गाण्यांपर्यंत फाल्गुनी पाठक गाऊ लागते तेव्हा आपोआप आपलीही पावले त्या ठेक्यावर नृत्य करू लागतात. फाल्गुनी पाठक आणि रास गरबा या समीकरणासाठी हजारो तरुण-तरुणी या उत्सवाची वाट बघत असतात. यावर्षी ही ‘दांडिया क्वीन’ फाल्गुनी पाठक मुंबईत असून बोरिवलीमध्ये परफॉर्म करणार आहे.


कुठे : प्रमोद महाजन कॉम्प्लेक्स, बोरीवली (Pramod Mahajan Complex, Borivali)

किंमत :  400 पासून सुरुवात

बुकिंग : https://in.bookmyshow.com/activities/navratri-utsav-with-falguni-pathak-2019/ET00110328

कधी : २९ सप्टेंबरपासून


) रंगोली रे २०१९, गोरेगाव

गोरेगावमधील नेस्को मैदानदेखील गेल्या कित्येक वर्षापासून दांंडिया आणि गरबासाठी प्रसिद्ध आहे. नवरात्रीचे नऊ दिवस इथं मोठ्या प्रमाणात गरबाप्रेमींची गर्दी पाहायला मिळते. गरबा आणि दांडियाच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध पार्थिव गोहील यांच्या गाण्यांवर पारंपरिक गुजराती स्टाईल गरबा खेळण्याची मजा घेता येईल. मुंबईतील बऱ्याच ठिकाणी गरबा मोठ्या मैदानावर खेळण्यात येतो. त्यामुळे गरबा रात्री १० वाजता बंद करण्यात येतो. पण नेस्को हे इनडोअर असल्यानं इथं साधारण रात्री १ वाजेपर्यंत तुम्हाला गरब्याची मजा लुटता येते.

कुठे : नेस्को ग्राऊंड, गोरेगाव (पू.)

किंमत : ५०० पासून सुरुवात

बुकिंग : https://in.bookmyshow.com/activities/rangilo-re-2019/ET00107956

कधी : २९ सप्टेंबरपासून

वेळ संध्याकाळी ६ ते रात्री १ वाजेपर्यंत 


) द ग्रेट इंडियन दांडिया फेस्टिव्हल, वांद्रे

जिओ गार्डन म्हटलं की, इथे तुम्हाला जास्तीत जास्त सेलिब्रिटीजची वर्दळ दिसते. वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल आणि तितकाच मोठा क्राऊड इथं गरबा खेळण्यासाठी येतो. इथं प्रत्येक येणाऱ्यांची खास व्यवस्था करण्यात येते. अंबानींच्या मालकीची जागा असल्यानं इथं नवरात्रोत्सवात वेगवेगळे अनेक कार्यक्रमही करण्यात येतात. पण केवळ ४ दिवसच तुम्हाला इथं गरबा खेळता येणार आहे. ४ ते ७ ऑक्टोबर या चार दिवसांमध्ये तुम्ही इथे गरबा खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटू शकता.

कुठे : जिओ गार्डन्स, बीकेसी, वांद्रा

किंमत : ४७१ पासून सुरुवात

बुकिंग : https://in.bookmyshow.com/activities/the-great-indian-dandiya-festival/ET00110181

कधी : ४ ते ७ ऑक्टोबर

वेळ : संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत


) श्री आझाद नगर नवरात्री महोत्सव मंडळ, वडाळा

पारंपरिकरित्या आणि बँडच्या आवाजावर इथं गरबा खेळला जातो. पारंपरिक वेशभूषेसह पारंपरिक गाण्यांवर आणि कच्छ बँडसह हा गरबा इथं नऊ दिवस खेळला जातो आणि हेच याचं वैशिष्ट्य आहे.


कुठे : आझाद नगर नवरात्री चौक, आरएके चौक, वडाळा (पश्चिम)

किंमत : मोफत

बुकिंगसाठी : नोंदणीची गरज नाही

कधी : २९ सप्टेंबरपासून

वेळ : संध्याकाळी ७ ते रात्री १०


) ठाणे रास रंग, ठाणे

ठाणे रस रंग नेहमी मोठा गरबा आयोजित करत असतात. तुम्हाला जर यावर्षी काहीतरी वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही ठाण्याला जाऊन गरबा नक्की खेळू शकता. उमेश बारोट, दिव्या जोशी, अमर देसाई यासारखे प्रसिद्ध कलाकार या गरब्यामध्ये परफॉर्म करणार आहेत. त्यामुळे तुम्हाला इथंही एक वेगळा अनुभव मिळेल.

कुठे : मॉडेल्ला मिल कंपाऊंड, ठाणे

किंमत : ३५४ पासून सुरुवात

बुकिंगसाठी : https://in.bookmyshow.com/activities/thane-raas-rang-2019/ET00109324

कधी : २९ सप्टेंबरपासून

वेळ : संध्याकाळी ७ ते रात्री १०




Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा