Advertisement

नवरात्रोत्सवाला प्रारंभ, मंदिरांत भाविकांची गर्दी


नवरात्रोत्सवाला प्रारंभ, मंदिरांत भाविकांची गर्दी
SHARES

शारदीय नवरात्रोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ होत असून ठिकठिकाणी घटस्थापना केली जाणार आहे. यानिमित्ताने पहाटेपासूनच देशभरात देवींच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. तर मुंबईतल्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी भक्तांची रांग लागली आहे.


नवरात्रीचे नऊ रंग

नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून आज पहिली माळ आहे. या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगाची वस्त्रे परिधान करण्याचीही प्रथा आहे. त्यामुळे नवरात्रीत वारानुसार त्या-त्या रंगांची वस्त्रे महिला-तरूणी घालतात. आज पहिल्या दिवशी निळा रंग आहे.


गरबा, दांडियाची धूम

नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये सगळीकडे गरब्याची धूम राहणार असून तरुणाई या नऊ दिवसांत मनसोक्तपणे गरबा खेळतात. त्यासाठी शहरातील विविध भागात गरबा महोत्सवाचं आयोजनही करण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरात आजपासून नऊ दिवस जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळणार आहे.


हेही वाचा - 

नक्षीकाम केलेल्या घागरा-चोलीची खरेदी करायचीय, मग इथे या

यंदा देवीही विराजमान होणार इकोफ्रेंडली मखरात

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा