Advertisement

गुढीपाडव्यासाठी बाप्पाच्या दर्शनाचं वेळापत्रक बदललं


गुढीपाडव्यासाठी बाप्पाच्या दर्शनाचं वेळापत्रक बदललं
SHARES

प्रभादेवी - मुंबईतील प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक असलेले सिद्धिविनायक मंदिरात हिंदू नविन वर्षानिमित्त म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन दररोजच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. गुढीपाडव्या निमित्त मंगळवारी 28 मार्चला मंदिर पहाटे 1.30 वाजता ते रात्री 12 वाजेपर्यंत बाप्पाच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.

या दिवशी पहाटेच्या आरतीची वेळ पहाटे 5 पासून ते 5.30 पर्यंत ठेवण्यात आली आहे. तर नैवेद्याची वेळ दुपारी 12 ते 12.30 पर्यंत ठेवण्यात आली आहे. सायंकाळची महापूजा आणि आरतीची वेळ 9 ते रात्री 10 अशी ठेवण्यात आली आहे. तसंच गुढीपाडव्या निमित्त करण्यात आलेल्या या बदलाची दखल भाविकांनी घ्यावी असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा