वरळी - दरवर्षीप्रमाणे यंदाही वरळीच्या आमरा सबाई सेवा संघाच्या वतीने सरस्वती देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या मंडळाचे यंदा 42 वे वर्ष आहे. खास बंगाली असलेल्या या देवीच्या उत्सवात सर्वच जाती धर्माचे लोक सहभागी होतात. पहिल्या दिवशी खिचडीचा महाप्रसाद, दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन मिरवणूक सोहळा असतो. या तीन दिवसीय उत्सवात मेडिकल कॅम्पचं देखील आयोजन केलं जातं. देवीची मूर्ती पाच फुटांची असून यासाठी भव्य डेकोरेशन करण्यात आलं आहे. माघ महिन्यात येणारा या देवीचा उत्सव यंदा 1 फेब्रुवारीपासून 3 फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.