तुम्ही राईडला तर अनेकदा गेला असाल. पण आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्या राईडवर घेऊन जाणार आहोत. आम्ही बोलत आहोत बार्बिक्यू राईडबद्दल (BBQ Ride). बार्बिक्यू राईड हा काय प्रकार आहे? तुम्हाला पडलेला प्रश्न अगदी योग्य आहे. हे तर काहीच नाही या बार्बिक्यू राईडची आणखी एक खासियत ऐकून तर तुम्ही अवाकच व्हाल. कारण ही राईड काही साधी नाही. तर ही आहे रॉयल एनफील्डवरील बार्बिक्यू राईड...
तुम्ही पक्के खवय्ये असाल तर साहजिकच बार्बिक्यू हा प्रकार तुम्हाला खायला नक्कीच आवडत असेल. आतापर्यंत तुम्ही बार्बिक्यू म्हणजे ग्रील केलेले चिकनचे वेगवेगळे प्रकार एखाद्या रेस्टॉरंटमध्ये खाल्लं असेल. पण पहिल्यांदाच तुम्हाला बार्बिक्यूची मजा रॉयल एनफिल्ड बाईकवर घेता येणार आहे.
भारतातल्या पहिल्या बाईक राईडची संकल्पना ही तिघा तरूणांची आहे. अरुण वर्मा, कृष्णा वर्मा आणि निजिश नायर या तिघांनी बार्बिक्यू बाईक राईडची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. अरूण, कृष्णा आणि निजिश या तिघांना बाईक रायडिंगसोबतच बार्बिक्यूची प्रचंड आवड आहे. त्यातूनच बाईक आणि बार्बिक्यू ही संकल्पना त्यांना सुचली.
भारतातील पहिली बार्बिक्यू बाईक ही प्रथम डोंबिवलीत अवतरली आहे. पुढच्या महिन्यात आणखी चार ठिकाणी बार्बिक्यू बाईकचे आऊटलेट्स सुरू करण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या भागात बार्बिक्यू बाईक राईड्सचे आयोजन केलं आहे.
तुम्ही बार्बिक्यू बाईक राईडची फ्रेंचायजीदेखील घेऊ शकता. किंवा तुम्हाला एखाद्या पार्टीसाठी बार्बिक्यू बाईक राईडची आवश्यकता असेल तर तेही शक्य आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या वेबसाईटला http://bbqrideindia.com/ आणि फेसबुक पेजला भेट देऊ शकता.
संपर्क : +918105208810
वेबसाईट : http://bbqrideindia.com/
हेही वाचा