Advertisement

पुण्याचा तंदूर चहा अाता डोंबिवलीत

पुण्यामध्ये प्रसिद्ध झालेला तंदूर चहा पिण्यासाठी मुंबईकरांना मात्र कसरत करावी लागायची. मुंबईहून खास एक तंदूर चहा पिण्यासाठी जाणं काही सर्वांना शक्य नव्हतं. पण आता हे शक्य झालं आहे. नाही नाही यासाठी मुंबईकरांना पुण्याला जायची गरज नाही

SHARES

तंदूर चिकन, तंदूरी कबाब, तंदूरी रोटी हे आपण कधी ना कधी खाल्लंच असेल. पण तुम्ही कधी तंदूर चहा प्यायला आहात का? पिण्याचं जाऊ दे पण कधी तंदूर चहा असा काही प्रकार सुद्धा असतो हे कधी ऐकलं आहे का? काहींनी ऐकलंही असेल. पण प्रत्यक्षात या तंदूर चहाचा आस्वाद मात्र मोजक्याच मुंबईकरांच्या नशिबी आला असेल. 

पुण्यामध्ये प्रसिद्ध झालेला तंदूर चहा पिण्यासाठी मुंबईकरांना मात्र कसरत करावी लागायची. मुंबईहून खास एक तंदूर चहा पिण्यासाठी जाणं काही सर्वांना शक्य नव्हतं. पण आता हे शक्य झालं आहे. नाही नाही यासाठी मुंबईकरांना पुण्याला जायची गरज नाही. कारण आता पुण्याच्या तंदूर चहाचं पहिलं आऊटलेट डोंबिवलीत सुरू झालं आहे.



असा जन्म झाला 

वाफाळणारा... मडक्यातला गरमागरम चहा कुल्लडमध्ये ओतला जातो आणि तो तुमच्या पुढ्यात ठेवला जातो. असा भन्नाट चहा बनवणारे प्रमोद बानकर आणि अमोल राजदेव हे दोघेही सायन्स ग्रॅज्युएट. पण नोकरी न करता या दोघांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला. गावाकडे शेकोटीत मडकं टाकून त्यात आजीने दिलेल्या हळदीच्या दुधावरून या दोघांना तंदूर चायची कल्पना सुचली. या चहाचे तसंच या चहा करण्याचे पेटंटसुद्धा आहे. भारतात फक्त चायला शॉपमध्ये तंदूर चहा मिळतो.



कसा बनतो तंदूर चहा?

एका मोठ्या तंदूरमध्ये विशिष्ट प्रकारची मातीची मडकी गरम केली जातात. त्यानंतर तयार केलेला चहा त्यात ओतला जातो. एकदा वापरलेलं मडकं पुन्हा वापरलं जात नाही. गरमा गरम चहा मातीच्या मडक्यात ओतल्यानं त्याला एक मातीचा सुगंध आणि स्मोकी फ्लेवर येतो. त्यानंतर वाफळता चहा एका विशिष्ट भांड्यात ओतला जातो. मग एका मातीच्या कुल्लडमध्ये ग्राहकांना सर्व्ह केला जातो. चहा तयार करण्याची पद्धत अनोखी असल्यानं चहा प्यायला येणारे ग्राहक ही पद्धत आवर्जून पाहत असतात.



इथं मिळतो तंदूर चहा

डोंबिवलीतल्या दोघा तरूणांनी तंदूर चहाची फ्रेंचायजी घेतली आहे. त्यामुळे लोकप्रिय अशा या तंदूर चहाचं पहिलं आऊटलेट आता डोंबिवलीत दाखल झालं आहे. डोंबिवली (पू.) इथल्या सर्वेश हॉलसमोर तुम्ही तंदूर चहाचा आस्वाद घेऊ शकता. जितेश पाटील या तरूणानं तंदूर चहाची फ्रेंचायजी घेतली आहे. 


">



हेही वाचा

चहा शौकिनांसाठी नवं डेस्टिनेशन 'बबल्स'

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा