मालाड - ही जत्रा आहे मालाडच्या कोकणी महोत्सवाची..या महोत्सवात चायनीज, पाणीपूरी, राजस्थानी लोणचं याची अगदी रेलचेल आहे.. कोकणी संस्कृती जपली जावी, कोकणी वस्तूंना बाजारपेठ मिळावी..म्हणून भाजप नेते मोहीत कम्बोज यांनी कोकणी महोत्सव भरवला खरा..पण या कोकणी महोत्सवातून कोकणी वस्तूच गायब आहेत.. त्यामुळे कोकणीवस्तू घ्यायला येणा-या ग्राहकांची मात्र घोर निराशाच झालीये..मात्र कोकणात सध्या भात कापयाची कामं सुरू असल्याने कोकणी लोकांनी महोत्सवाला हजेरी लावली नसल्याच कारण राजकारणी देतायत..त्यामुळे एकीकडे कोकण महोत्सव भरवून, कोकणी वस्तुच गायब असणा-या या महोत्सवात संस्कृती दडपण्याचं राजकारण केलं जातंय की काय असा प्रश्न पडतोय..मुंबई लाईव्ह