पोटात कावळे ओरडू लागले की आपण काही तरी चटर-पटर खातो. वडापाव, भजीपाव किंवा फ्रेंकी, बर्गर असे पर्यायच आपण पोट भरण्यासाठी निवडतो. अर्थात हे जंक फूड तुमच्या आरोग्यासाठी घातकच आहे. आता तुम्ही म्हणाल घातक आहे हे माहीत आहे. पण आम्ही खायचं तरी काय? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे नटी योगी.
नटी योगी हा ब्रँड ऑनलाईन असल्यानं तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असाल ते तुम्हाला घरपोच सर्व पोहोचवतील. त्यांच्याकडे ऑरगॅनिक फूड मिळतं. काकाओ नीब्स ट्रेल मिक्स अॅण्ड डार्क चॉकलेट आणि वॉलनेट ग्रॅनोला हे तुम्ही ट्राय करू शकता. टी टाईममध्ये तुम्ही स्मोक्ड कॅरेमल मखना, रोस्टेड सॉय नट्स आणि जिरा खाकरा क्रिप्स याचा आस्वाद घेऊ शकता.
तुम्हाला काही स्पायसी खायचं असल्यास जॅकफ्रुट पिकल (फणसाचं लोणचं), गार्लिक पिकल (अाल्याचं लोणचं), हरीशा सॉस आणि सॅसमे म्हणजे सफेद तीळ असं बरंच काही इथं मिळतं. याशिवाय सेंद्रीय मक्याचं पीठ, ज्वारी, नाचणी, बाजरी, जव अशी वेगवेगळी पीठ इथं मिळतात. यापासून तुम्ही चपात्या बनवू शकता. विशेष म्हणजे इथं नारळापासून बनवलेली साखर, नीम हनी मिळते. तेल पण इथं मिळतं.
नटी योगा
वेबसाईट : https://nuttyyogi.com/
हेही वाचा