Advertisement

बोरीवली फुटबाॅल लीगमध्ये मिलान क्लबचा धडाकेबाज विजय


बोरीवली फुटबाॅल लीगमध्ये मिलान क्लबचा धडाकेबाज विजय
SHARES

एकीकडे फिफा वर्ल्डकपचा फिव्हर संपूर्ण जगभर पसरला असतानाच बोरीवली पश्चिम येथील सेंट फ्रान्सिसी डी असिसी हायस्कूलच्या ग्राउंडवर सध्या बोरीवली प्रीमिअर फुटबाॅल लीगचा धमाका सुरू अाहे. बीपीएफएलमध्ये मिलान क्लबने शुक्रवारी रंगलेल्या ब गटातील सामन्यात काजूपाडा फुटबाॅल क्लबचा ९-० असा धुव्वा उडवत दमदार विजयाची नोंद केली. अमेय जितेंद्र, सनी ठाकूर, नचिकेत पालव, अनिकेत दळवी यांनी प्रत्येकी दोन गोल झळकावत मिलान क्लबच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.


कुणाल पटेल ठरला तारणहार

बोरीवली स्पोर्टस फाऊंडेशनतर्फे सुरू असलेल्या या सामन्यात कुणाल पटेलने अखेरच्या क्षणी केलेल्या गोलमुळे मिर्मिडाॅन्स एससीने रुथलेस एससीविरुद्ध १-१ अशी बरोबरी पत्करली. अ गटातील चुरशीच्या झालेल्या या सामन्यात हेमकत सिंगने सुरुवातीलाच गोल करून रुथलेसला अाघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर सामना संपायच्या शेवटच्या मिनिटाला कुणाल पटेलने गोल करून मिर्मिडाॅन्सला बरोबरी साधून दिली.


शेलार एफसीचा विजय

ब गटातील सामन्यात शेलार एफसीने व्हायब्रंट्स एफसीचे अाव्हान २-० असे सहज मोडून काढले. स्ट्रायकर गणेश सालकर अाणि भावेश विचारे यांचे प्रत्येकी एक गोल शेलार एफसीच्या विजयात मोलाचे ठरले.


हेही वाचा -

बोरीवली फुटबाॅल लीगमध्ये गतविजेत्या फ्लिट फूटर्सची विजयी सुरुवात

शिव्या घाला, टीका करा, या सुनील छेत्रीच्या भावनिक अावाहनानंतर मुंबईतील सामना हाऊसफुल्ल



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा