मागील दोन महिने महाराष्ट्रातील (maharashtra) कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या प्रचंड वाढली होती. नव्या रुग्णांचा आकडा ५० ते ६० हजारांवर गेला होता. मात्र, आता रुग्णसंख्या घटू लागली आहे. मंगळवारी राज्यात १४ हजार १२३ नवीन रुग्ण आढळले. तर ३५ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसंच ४७७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबईत (mumbai) मंगळवारी ८३१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ५८६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत आतापर्यंत ९५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईत १७३२८ सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४५३ दिवसांवर गेला आहे.
राज्यात कोरोनाची कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५७ लाख ६१ हजार ०१५ झाली आहे. यामधील ५४ लाख ३१ हजार ३१९ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.२८ टक्के ढे झाले आहे. मृत रुग्णांची संख्या ९६ हजार १९८ इतकी झाली आहे. राज्याचा मृत्यूदर १.६७ टक्के आहे.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५२,७७,६५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,६१,०१५ (१६.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७,६८,११९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ९,३१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
सध्या राज्यात २ लाख ३० हजार ६८१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक ३० हजार ९२ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर सातारा जिल्ह्यात २० हजार ७७७, मुंबईत २० हजार १४७, कोल्हापूर जिल्ह्यात १८ हजार ५९०, ठाणे जिल्ह्यात १८ हजार ३३९ आणि सांगली जिल्ह्यात ११ हजार ९२६ अशी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
१ मुंबई महानगरपालिका ८३०
२ ठाणे १३८
३ ठाणे मनपा १२६
४ नवी मुंबई मनपा ८७
५ कल्याण डोंबवली मनपा ११७
६ उल्हासनगर मनपा ३६
७ भिवंडी निजामपूर मनपा ७
८ मीरा भाईंदर मनपा ५४
९ पालघर २८४
१० वसईविरार मनपा १४९
११ रायगड ४६३
१२ पनवेल मनपा ८३
ठाणे मंडळ एकूण २३७४
१३ नाशिक १८७
१४ नाशिक मनपा १०५
१५ मालेगाव मनपा ०
१६ अहमदनगर ९१४
१७ अहमदनगर मनपा ३९
१८ धुळे ३८
१९ धुळे मनपा ४४
२० जळगाव २०२
२१ जळगाव मनपा ८
२२ नंदूरबार १४
नाशिक मंडळ एकूण १५५१
२३ पुणे ८२७
२४ पुणे मनपा ४०१
२५ पिंपरी चिंचवड मनपा २७६
२६ सोलापूर ५६३
२७ सोलापूर मनपा ३१
२८ सातारा १५३५
पुणे मंडळ एकूण ३६३३
२९ कोल्हापूर ९७३
३० कोल्हापूर मनपा ३६४
३१ सांगली ७३७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७
३३ सिंधुदुर्ग ५३५
३४ रत्नागिरी ५५९
कोल्हापूर मंडळ एकूण ३३४५
३५ औरंगाबाद १७२
३६ औरंगाबाद मनपा ७२
३७ जालना १०३
३८ हिंगोली ३९
३९ परभणी ४७
४० परभणी मनपा ७
औरंगाबाद मंडळ एकूण ४४०
४१ लातूर ८२
४२ लातूर मनपा २२
४३ उस्मानाबाद २९९
४४ बीड ३८३
४५ नांदेड ३७
४६ नांदेड मनपा ३७
लातूर मंडळ एकूण ८६०
४७ अकोला १७५
४८ अकोला मनपा १४३
४९ अमरावती २२३
५० अमरावती मनपा ६९
५१ यवतमाळ १८३
५२ बुलढाणा ३०६
५३ वाशिम १८५
अकोला मंडळ एकूण १२८४
५४ नागपूर ५४
५५ नागपूर मनपा १६०
५६ वर्धा ९६
५७ भंडारा ९५
५८ गोंदिया २३
५९ चंद्रपूर ९१
६० चंद्रपूर मनपा २७
६१ गडचिरोली ९०
नागपूर एकूण ६३६
हेही वाचा -