नवी मुंबईत शुक्रवारी (२१ आॅगस्ट) कोरोनाचे नवीन ३३२ रुग्ण सापडले आहेत. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता २२,६०७ झाली आहे.
शुक्रवारी बेलापूर ४३, नेरुळ ७४, वाशी ४८, तुर्भे २७, कोपरखैरणे ४४, घणसोली ४४, ऐरोली ४८ आणि दिघामध्ये ४ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३५० जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर ५७, नेरुळ ६८, वाशी २५, तुर्भे ३७, कोपरखैरणे ५८, घणसोली ४३, ऐरोली ४६ आणि दिघामधील १६ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १८६५४ पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ५३१ झाला आहे.
नवी मुंबईत सध्या ३४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नवी मुंबईत आतापर्यंत ७ हजार ९८० प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. येथे एका दिवसाला अडीच हजारपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८३ टक्के झाला आहे.
हेही वाचा -
कोरोनाच्या कॉलर ट्यूनमुळे मनसे नेता त्रस्त, ट्विट करून...
Ganesh Festival 2020: 'गणपतीसाठी कोकणात जाण्यावर घातलेले निर्बंध योग्यच'