मुंबईत कोरोनाचा (coronavirus) मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्याने मुंबई महापालिकेने (mcgm) मुंबईतील काही भागांना हॉटस्पॉट (hotspot) म्हणून घोषित केलं आहे. या हाॅटस्पाॅमधील १३ असे वाॅर्ड आहेत. ज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५० वर गेली आहे.
राज्यातील स्थिती
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात (corona patient in maharashtra) बुधवारी ११७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात एकट्या मुंबईतील ६६ रुग्णांचा समावेश आहे. तर, पुण्यातही ४४ रुग्ण कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याशिवाय, ठाणे ३, मीरा-भाईंदरमधील २, वसई-विरार व पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २८०१ वर पाेहोचला आहे.
हेही वाचा - वांद्र्यातील घटनेला भाजप देतंय जातीय रंग, संजय राऊतांचा आरोप
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 15, 2020
As on 14-Apr l Positives at Wards
Our @mybmc & @MumbaiPolice teams are giving their all to take care, protect & secure everyone in these times.
We appeal everyone to #StayHomeStaySafe & thereby #HelpUsHelpYou#BlessedToServe#AnythingForMumbai#NaToCorona https://t.co/YXYH0W8NqZ pic.twitter.com/qtmP6i1wjB
मुंबईतील हाॅटस्पाॅट
तर, मुंबई महापालिकेने (corona patient in mumbai hotspot) १४ एप्रिल रोजी पर्यंत नोंद झालेल्या कोरोना रुग्णांची वाॅर्डनिहाय आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीनुसार १३ असे वाॅर्ड आहेत. ज्यामधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५० च्या वर जाऊन पोहोचली आहे. तर ३ असे वाॅर्ड आहेत जिथं कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०० च्या वर गेली आहे.
जी दक्षिण : या वाॅर्डमध्ये परळ एसटी डेपो, वरळी गाव, वरळी डेअरी परिसर, वरळी बीडीडी चाळ, गांधी नगर, महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरु तारांगण, शांती नगर इ. परिसर येतो. या परिसरात मुंबईतील सर्वाधिक ३६० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे.
ई : या वॉर्डमध्ये जीजामाता उद्यान, माझगांव, कस्तुरबा हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, जे.जे हॉस्पिटल इ. परिसर येतो. या परिसरात १३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
डी : या वाॅर्डमध्ये बेलासिस चाळ, वेलिंग्टन स्पोर्ट क्लब, प्रियदर्शीनी पार्क, कमला नेहरु पार्क, ऑपेरा हाऊस, खेतवाडी इ. परिसर येतो. या परिसरात १३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे.
या तिन्ही वाॅर्डमधील कोरोनाबाधितांची संख्या १०० च्या वर जाऊन पोहोचली आहे.
हेही वाचा - रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मुंबईकरांना हायड्रोक्लोरोक्वीनचा डोस
त्याशिवाय जी एन वाॅर्डमध्ये ९७, एच ई वाॅर्डमध्ये ९६, एम ई वाॅर्डमध्ये ९५, के ई वाॅर्डमध्ये ९०, के ब्ल्यू वाॅर्डमध्ये ८८, एल वाॅर्डमध्ये ८५, एस वाॅर्डमध्ये ६७, एम ब्ल्यू वाॅर्डमध्ये ६२, एफ एन वाॅर्डमध्ये ५८ आणि पी एन वाॅर्डमध्ये ५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.