Advertisement

कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील लोकांचा महापालिका घेणार शोध


कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील लोकांचा महापालिका घेणार शोध
SHARES

मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळं महापालिकेनं उपचारासाठी कंबर कसली आहे. त्याशिवाय, बाधित रुग्णांमुळ त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना कोरोनाचा धोका अधिक असल्यानं महापालिकेनं यांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या जवळपास १४ हजार व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे.

१० सप्टेंबरपासून अशा ६६ हजार ५५० लोकांना शोधून त्यांची अवश्यकतेनुसार तपासणी करून क्वारंटाइन करण्यात आलं आहे. १ सप्टेंबरपासून मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी महापालिकेनं चाचण्यांचे प्रमाण वाढवलं आहे. दररोज १४ ते १५ हजार व्यक्तीची चाचणी केली जात असून, पॉसिटीव्ह येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांचीही तपासणी केली जात आहे.

संपर्कातील लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्यांना क्वारंटाइन केलं जातं आहे. याआधी दररोज सरासरी ७ हजार संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात आला होता. मात्र, १० सप्टेंबरपासून १४ ते १५ हजार व्यक्तीची चाचणी केली जात आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा