धारावीत मंगळवारी कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी झाल्याचं दिसून आलं आहे. मंगळवारी धारावीत २६ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. धारावीत रोज ५० ते ८० कोरोना रुग्ण सापडतात. मंगळवारी कमी रुग्ण सापडल्याने धारावीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. धारावीतील एकूण रुग्णसंख्या आता १३५३ झाली आहे. याशिवाय मागील तीन दिवसात धारावीत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचं पालिका प्रशासनाने सांगितलं आहे.
धारावीतील जय भवानी हौसिंग सोसायटी, धारावी पोलीस चाळ, बॅट्री को मुर्गा, एकेजी नगर, कुंभारवाडा, पारशी चाळ, इंदिरा नगर, सीताराम कोळी चाळ, आझाद नगर, संत ककैय्या मार्ग आणि ट्रान्झिस्ट कँम्प येथे प्रत्येकी १, शेठ चाळ आणि न्यू म्युनिसिपल वसाहत येथे प्रत्येकी दोन, चमडाबाजार येथे ३ आणि माटुंगा लेबर कँम्प येथे ८ रुग्ण सापडले आहेत.
धारावीपाठोपाठ माहीममध्येही कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. माहीममध्ये मंगळवारी १३ रुग्ण सापडले. माहीममधील कोरोना रुग्णांची संख्या आता २३४ झाली आहे. कापड बाजार, किल्ला कंपाऊंड, नुरानी बिल्डिंग, हिमगिरी हौसिंग सोसायटी, माहीम मच्छिमार कॉलनी आणि मधूर सहनिवास येथे प्रत्येकी एक, श्री बालगोविंद हौसिंग सोसायटी येते दोन आणि माहीम पोलीस कॉलनीत पाच नवे रुग्ण सापडले आहेत. तर दादर येथे तीन रुग्ण सापडल्याने येथील रुग्णसंख्या १७६ झाली आहे. पंकज बिल्डिंग, खांडके बिल्डिंग आणि स्वराज्य हौसिंग सोसायटीत प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.
हेही वाचा -
ठाण्यातील कंटेन्मेंट झोनची लिस्ट, संपूर्ण तपशीलासह...
महाराष्ट्रासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करा, देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारकडे मागणी