Advertisement

टाटा मेमोरियल ट्रस्टमध्ये पदवीदान समारंभ


टाटा मेमोरियल ट्रस्टमध्ये पदवीदान समारंभ
SHARES

परळ - "सेवा, शिक्षण आणि संशोधन असे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या परळ (पू.) येथील टाटा मेमोरिअल सेंटर हे होमी भाभा राष्ट्रीय संस्थानाचा एक भाग असून कर्करोगाची ओळख पुसून रुग्णांना जगण्याची उमेद देणारे सर्वात उत्तम असे सेंटर आहे," असे गौरवोद्गार केंद्रीय मानव संसाधन मंत्री डॉ. प्रकाश जावडेकर यांनी टाटा मेमोरियल सेंटरच्या वतीने शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान सोहळा 2017 या कार्यक्रमात व्यक्त केले.

'कर्करोग म्हटलं की, पूर्वी भयंकर आजार म्हणून लोक घाबरून जायचे. त्यांचा हा चुकीचा समज टाटा मेमोरियल सेंटरने पुसून टाकला आहे. या सेंटरमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 40 टक्क्यांहून अधिक रुग्ण डोके, मान, नाक, कान आणि जीभ या कर्करोगाने ग्रस्त असून उपचार घेण्यासाठी येत असतात. त्यांच्यावर वेळेत उपचार करून येथील डॉक्टर रुग्णांना बरे करतात आणि हेच येथील डॉक्टरांचे खरे प्रमाणपत्र असते,' असे देखील डॉ. प्रकाश जावडेकर म्हणाले. यावेळी टाटा मेमोरियल सेंटर संचालक डॉ. राजेंद्र बडवे, डॉ. पी. डी. गुप्ता, डॉ. कैलास शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी मान्यवरांच्या हस्ते 130 विदयार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा