Advertisement

कोरोनाचा पुन्हा हाहाकार! केंद्र सरकारही अलर्ट, राज्यांना निर्देश

सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून याबाबत सतर्क केले आहे.

कोरोनाचा पुन्हा हाहाकार! केंद्र सरकारही अलर्ट, राज्यांना निर्देश
SHARES

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने (corona) कहर सुरू केला आहे. चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. रुग्णालयातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिस्थिती अशी आहे की खाटांचा तुटवडा पडत आहे. रुग्णांवर जमिनीवर झोपवून उपचार केले जात आहेत.

डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफचीही कमतरता भासत आहे. औषध आणि ऑक्सिजनचं संकट वाढत आहे. चीनची एकूणच परिस्थिती जगाला धडकी भरवणारी आहे.

जगातील अनेक देशांमध्ये कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. अमेरिका, जपान, चीन, कोरिया आणि ब्राझीलमधील वाढत्या कोरोना केसेसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून याबाबत सतर्क केले आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे की, जपान, अमेरिका, कोरिया, ब्राझील आणि चीनमधील (china) कोरोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ होत असल्याने जीनोम चाचणीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सर्व राज्यांना विनंती करण्यात येते की, शक्यतोपर्यंत, सर्व संक्रमित प्रकरणांचे नमुने दररोज INSACOG जीनोम सिक्वेन्सिंग लॅबोरेटरीज (IGSLs) ला पाठवले जातील.

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 112 नवीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 3,490 वर आली आहे. गेल्या 24 तासांत संसर्गामुळे आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने देशातील एकूण मृतांची संख्या 5,30,677 झाली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा