लोकवर्गणीतून १६ कोटी रुपये जमवून इंजेक्शनची तजवीज करुनही पिंपरी चिंचवडमधील चिमुकल्या वेदिका शिंदेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. १ ऑगस्ट सायंकाळाळी वेदिका खेळत असताना तिला अचानकपणे श्वास घेण्यास त्रास होण्यास सुरुवात झाली. यानंतर रुग्णालयात दाखल केलं. मात्र दुर्दैवानं तिचा मृत्यू झाला आहे.
वेदिकावर उपचार करण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी क्राऊड फंडिंगद्वारे १६ कोटी रुपये जमा केले होते. मात्र पालकांचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत.
फेब्रुवारी महिन्यात तीरा कामत या चिमुरडीला अमेरिकेतून तब्बल १६ कोटींचे इंजेक्शन दिल्यामुळे तिचा जीव वाचवण्यात यश मिळालं होतं. त्यानंतर पुण्यातील चिमुरडी वेदिका शिंदे ही देखील या जनुकीय आजारानं ग्रस्त होती.
वेदिकासाठी देखील १६ कोटी रुपये लोकवर्गणीतून जमा करण्यात आले होते. पुण्याच्या खासगी रुग्णालयात जून महिन्यात वेदिकाल झोलगेन्स्मा (Zolgensma) हे इंजेक्शन देण्यात आले होते. वेदिकावर उपचार व्हावेत आणि तिला महागडे १६ कोटीचे इंजेक्शन मिळावं यासाठी तिच्या आई-वडिलांनी खूप धडपड केली होती.
कोणता होता आजार?
वेदीका ही पाच महिन्यांची होती तेव्हा तिला SMA टाईप-1, या जनुकीय आजार असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे वय वाढण्याबरोरब तिच्या शरीरातील एक-एक अवयव निकामी होत चालला होता. या आजारावर उपचार करणं आवश्यक होतं. या आजारावर मात करण्यासाठी झोलगेन्स्मा (Zolgensma) ही एकमेव लस उपलब्ध आहे. या लसीसाठी लोकवर्गणीतून पैसे जमा करून तिला लस देण्यात आली होती.
हेही वाचा