मालाड - अक्सा बीच. एरवी पर्यटकांसाठी मौजमस्ती करण्याचं ठिकाण. मात्र सध्या हा बीच प्रतिभा जोशी यांच्यासाठी त्यांच्या तान्हुल्यावर उपचारांचं केंद्र ठरलंय. आपल्या दोन वर्षांच्या चिमुरड्याला ही आई बीचवरच्या वाळूमध्ये अगदी छातीपर्यंत गाडून ठेवतेय... पण थांबा... हा कसलाही अघोरी प्रकार नाही, तर उपचार आहे. या मुलाला जन्म देताना व्हॅक्युम डिलिव्हरी करावी लागली होती. त्यामुळे या चिमुरड्याला नीट श्वासही घेता येत नव्हता. तसेच त्याला चालतानाही त्रास होतोय आणि त्याला नीट दिसतही नाहीये. मुलाला गरम वाळू आणि सूर्याची किरणं यांचा दुहेरी शेक मिळावा, म्हणून त्यांनी हा उपाय केलाय.