Advertisement

सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये 2025 मध्ये सुरू होणार यकृत प्रत्यारोपण प्रोग्राम

सरकारी रुग्णालये त्याच शस्त्रक्रिया कमी खर्चात करतात.

सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये 2025 मध्ये सुरू होणार यकृत प्रत्यारोपण प्रोग्राम
SHARES

राज्य-संचालित सेंट जॉर्ज हॉस्पिटल 2025 च्या सुरुवातीला यकृत प्रत्यारोपण सुरू करण्याच्या तयारीत आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली आहे.

रूग्णालयाने शस्त्रक्रियांसाठी 1 कोटी किमतीची उच्च दर्जाची उपकरणे आधीच घेतली आहेत. खाजगी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांचा मोठा खर्च परवडत नसलेल्या असंख्य वंचित रुग्णांना याचा फायदा होईल. 

“सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेसाठी समर्पित एक अतिदक्षता विभाग आधीच स्थापित करण्यात आला आहे.” असे रुग्णालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

आवश्यक प्रशासकीय मान्यता आणि नूतनीकरणामुळे ही योजना लवकरच सुरू होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यक्रमाला गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या खर्चास मंजुरी दिली आहे.

“या रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया गरिबांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी मागील सरकारच्या काळात प्रयत्न करण्यात आले. काही पायाभूत काम पूर्ण झाले असले तरी, नवीन वर्षापासून शस्त्रक्रिया सुरू होतील याची खात्री करण्यासाठी आम्ही आता प्रकल्पाचे पुनरावलोकन करत आहोत,” असे एका वरिष्ठ राज्य वैद्यकीय शिक्षण अधिकाऱ्याने सांगितले.

दक्षिण मुंबईतील एक खाजगी रुग्णालयही ट्रिटमेंटमध्ये मदत करेल. तसेच अनुभवी डॉक्टर मार्गदर्शन पण करतील. 

खाजगी रुग्णालयांमध्ये यकृत प्रत्यारोपणासाठी 20 लाख ते 25 लाख रुपये खर्च येऊ शकतो आणि सगळ्यांना परवडणारे नसते. याउलट, सरकारी रुग्णालये त्याच शस्त्रक्रिया कमी खर्चात करतात. उदाहरणार्थ, केईएम हॉस्पिटल 5 लाख ते 10 लाख रुपयांमध्ये यकृत प्रत्यारोपण करते. सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील आगामी कार्यक्रमामुळे खर्च आणखी कमी होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

'आपली चिकीत्सा' योजना पुन्हा सुरू

ठाणे जिल्हा रुग्णालयात झिका रुग्णांसाठी स्पेशल वॉर्ड

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा