Advertisement

चिंता वाढली, मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित

जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

चिंता वाढली, मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित
SHARES

जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपाक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. जगातील वाढती रुग्णसंख्या लक्षात जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मंकीपॉक्स व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी तात्काळ पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. 70 देशांहून अधिक ठिकाणी मंकीपॉक्सची रुग्णसंख्या आहेत. भारतातही तीन रुग्ण आढळले आहे. 

तज्ज्ञांच्या मते 'मंकीपॉक्स' हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.

संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ‘मंकीपॉक्स’ची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा